मित्रांनो, इयत्ता 12वी ही आपल्या जीवनातील एक जीवन बदलणारी पायरी आहे. कारण आपण अद्भुत करिअर बनवण्याच्या एक पाऊल पुढे जात आहोत. पण, बारावीनंतर करिअर कसे निवडायचे ? हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना पडणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी आणि अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आणि योग्य निवडण्यासाठी, त्यांना एकतर आत्मनिरीक्षण करावे लागेल किंवा त्यांना योग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. म्हणूनच आज आपण बारावीनंतरची कशी काही पाच कोर्स विषयी जाणून घेणार आहोत की जे केल्यामुळे भविष्यात आपल्याला चांगले उत्पन्न कमावता येते. हे कोर्स कोणते व त्याचा अभ्यासक्रम व त्यातून मिळणारे उत्पन्न किती? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
त्याचे पहिला कोर्स म्हणजे CYBER SECURITY. सध्या टेक्नॉलॉजी खूप झपाट्याने वाढलेली आहे.सायबरसुरक्षा ही प्रणाली, नेटवर्क आणि प्रोग्राम्सना डिजिटल हल्ल्यांपासून संरक्षित करण्याचा सराव आहे. हे सायबर हल्ले सामान्यतः संवेदनशील माहितीमध्ये प्रवेश करणे, बदलणे किंवा नष्ट करणे या उद्देशाने असतात; रॅन्समवेअरद्वारे वापरकर्त्यांकडून पैसे उकळणे; किंवा सामान्य व्यवसाय प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणणे. आणि या सायबर सिक्युरिटी क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध झालेला आहे. आज काल जगामध्ये सर्व काही डिजिटल होत आहे आणि त्यामुळे त्यांना सायबर सिक्युरिटी ची गरज खूप प्रमाणात भासत आहे. आज-काल बँका व ॲप द्वारे ऑनलाइन पेमेंट करत आहेत अशा ॲपला सायबर सिक्युरिटी ची गरज खूप प्रमाणात भासत आहे. म्हणूनच आयटी क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना मागणी आहे तुम्ही हा कोर्स करू शकता. कोर्सचा कालावधी 6 महिन्यापासून 2 वर्षांपर्यंत आहे. कोर्स फी 15,000 रुपयांपासून 1,50,000 रुपयापर्यंत आहेत.
मास्टर डिग्रीसाठी 3 वर्ष आणि साडे चार लाखांची फी घेतली जाते. त्यानंतर तुमच्या पात्रते नुसार तुम्हाला या क्षेत्रांमध्ये जॉब मिळाल्यावर महिना 25,000 ते 1,50,000 पगार दिला जातो.
दुसरा जो कोर्स आहे तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग साठी आजकाल जास्त स्कोप झालेला आहे. अनेक कंपन्या आपल्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी ज्या लोकांचे डिजिटल मार्केटिंग झालेले आहेत अशा विद्यार्थ्याचा शोध हा ते घेत असतो. आजकाल सर्व काही ऑनलाईन झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या कंपन्या आपल्या प्रोडक्टची विक्री ही डिजिटल मार्केटिंगच्या साह्याने करत असतात. म्हणूनच आज डिजिटल मार्केटिंग हा कोर्स शिकणे खूप गरजेचे झाले आहे. या कोर्सचा कालावधी हा तीन महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत आहे. कोर्सची फी ही दहा हजार पासून ते 50 हजार रुपये पर्यंतची आहेत आणि या कोर्समध्ये जर आपण चांगले पारंगत चालू व त्या अंतर्गत जर आपल्याला एखादी जॉब मिळाली तर आपल्याला महिना पंधरा ते तीस हजार रुपये पर्यंतचा पगार मिळू शकतो.
तिसरा जो कोर्स आहे तो म्हणजे नर्सिंग. कोरोना नंतरच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची गरज जास्त प्रमाणात भासू लागलेले आहेत. मागच्या वर्षांमध्ये जवळजवळ एक हजार पर्यंतची जागा या वैद्यकीय क्षेत्रामध्ये निघालेला होत्या आणि भरती देखील तितक्याच करून घेतलेला आहे. हा नर्सिंग चा कोर्स तुम्ही करून खाजगी हॉस्पिटलमध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये रक्त लघवी तपासणी केंद्र मध्ये किंवा स्वतःचे मेडिकल काढू शकता व या कोर्सची फी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळे आहे. या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी तुमची काही वेळेला प्रवेश परीक्षा देखील घेतली जाऊ शकते. सर्व साधारणपणे या कोर्ससाठी पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंतचा खर्च हा आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये नोकरी लागली तर तुमच्या कोर्सच्या पात्रतेनुसार 15000 ते 50 हजार रुपये पर्यंतचा दोन महिना पगार हा दिला जातो.
चौथा जो कोर्स आहे तो म्हणजे ग्राफिक डिझाईन. हा कोर्स देखील डिजिटल मार्केटिंग इतका महत्त्वाचा आहे. मोठमोठे फोटो स्टुडिओ, न्यू पोर्टल, यूट्यूब चैनल असा ठिकाणी ग्राफिक डिझायनर व्यक्तींची खूप म्हणजे खूप गरज असते. या क्षेत्रामध्ये ग्राफिक डिझाईन सोबतच तुम्हाला या कोर्ससाठी विविध जे काही ॲप आहेत त्या ॲपची योग्य ती नॉलेज असते खूप देखील गरजेचे आहे. यामध्ये फक्त व्हिडिओ एडिटिंग करणे हे नव्हे तर त्यासाठी असणारे स्वतःचे स्किल देखील गरजेचे आहे. तुमच्या स्किल्सनुसार सुरुवातीला वीस हजार ते पन्नास हजार रुपये पर्यंतचा पगार मिळू शकतात. या ग्राफिक डिझाईन कोर्सची फीही दहा हजारापासून सुरू आहे.
पाचवा कोर्स आहे तो म्हणजे व्हिडिओ एडिटिंग. यूट्यूब चैनल, न्यूज मीडिया, फोटो स्टुडिओ अशा कितीतरी प्रोफेशनल ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग ची गरज असते. लग्नाच्या व्हिडिओसाठी तर फोटो स्टुडिओ वाल्याला योग्य तो व्हिडिओ एडिटिंग करणाऱ्या व्यक्तीची गरज ही असते. परंतु त्यासाठी योग्य ते म्युझिक, योग्य ते ग्राफिक, तसेच योग्य ते इमेजस योग्य योग्य पद्धतीने क्रिएटिव्ह देखील गरज असते. जे तुम्हाला या व्हिडिओ एडिटिंग चा कोर्स चा माध्यमातून सर्व काही शिकता येते. पण महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी तुमच्या मध्ये क्रिएटिव्हिटीची एनर्जी असणे खूप गरजेचे असते. सुरुवातीला तुम्हाला यामध्ये जवळजवळ वीस ते पन्नास हजार रुपये पर्यंतचा पगार मिळतो. हा कोर्स शिकण्यासाठी देखील खूप मोठी फी तुम्हाला भरावी लागू शकते. यासाठी या कोर्सच्या नामांकित विद्यापीठांमध्ये तुम्हाला प्रवेश घेणे खूप गरजेचे असते.
अशाप्रकारे हे काही पाच कोर्सेस आहेत जे तुम्हाला बारावीनंतर करता येतात. चांगल्या प्रकारे मिळू शकते.