मित्रांनो, महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनातर्फे विविध प्रकारचे योजना राबवल्या जातात आणि या योजनांचा लाभ हा आर्थिक मागास तसेच त्यांचे उत्पन्न कमी आहे अशा लोकांना होत आहे. याच योजनांमध्ये एक योजना ही विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली आहे. जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जावू इच्छित आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलीना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेश शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज इमाय व विभाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती सन २०२२-२३ या आर्थिकवर्षामध्ये निवडीसाठी महाराष्ट्र शासनाच्या या मागास जातीच्या पर्वर्गातील मुलांना शिष्यवृत्ती दिली जात आहे.
यासाठी काही अटी व शर्ती सांगितलेला आहे. त्यामध्ये विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. पालकांचे कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गाने मिळालेली वार्षिक उत्पन्न रु.8 लाखापेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत THE (Time Higher Education आणि QS World University Ranking २०० च्या आतील असावी. शिष्यवृत्ती द्यावायाच्या एकूण जागेपैकी ३० जागेवर मुलींची निवड करण्यात येईल.
अन्य अटी व शर्ती हया सविस्तर जाहिराती मध्ये तसेच विजाभज इमाय व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील.अर्जाचा नमूना, शासन निर्णय अधिक सविस्तर माहितीसाठी पुदीत संकेतस्थळाला भेट द्यावी. www.maharashtra.gov.in या संकेतस्थावरील रोजगार वा लिंकवर मेट दयावी.
सदरील योजना शासन निर्णय इमाव विजाभज आणि विभाग कल्याण विभाग क्र. शिवृती २०१८/प्र.क्र.११८/शिक्षण, दि.११ ऑक्टोबर २०१८ नुसार सदरचा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्यान संचालनालय, महाराष्ट्रा राज्या पुणे-१ यांचेकडे दि.२३/६/२०२२ रोजी सायं ६.१५ पर्यंत जमा करावा. अटी व शर्ती या शिष्यवृत्तीसाठी सांगितले गेलेले आहेत.
या योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना कोणकोणते लाभ दिले जातात याची माहिती आता आपण जाणून घेऊया. या योजनेअंतर्गत विद्यार्थी च्या विद्यापीठांमध्ये अर्ज करत आहे त्या विद्यापीठाने आकारलेली शिक्षणाची पूर्ण रक्कम या योजना अंतर्गत दिली जाते. त्याचबरोबर विद्यापीठाच्या निष्कर्षानुसार वैयक्तिक विमा खर्च देखील दिला जातो.
विद्यार्थास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंतिगिक संस्थेने उरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DCPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रामाणे अथया महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहिर करेल. ती रक्क्म निर्वाह भता दिला जातो. विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशास्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च दिला जातो.
अशाप्रकारे जे विद्यार्थी मागासवर्गीय जाती जमातीमध्ये येतात अशा गुणवंत विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत परदेशामध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होते व त्याद्वारे त्यांचा संपूर्ण खर्च हा दिला जातो.