केंद्र सरकार आतापर्यंत पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे धोरण अवलंबत होतं. त्यामुळे आठवीपर्यंत कोणी नापासच होत नसायचं. मात्र आता केंद्र सरकारने नवा नियम केला आहे. इथून पुढे कोणालाही पाचवी ते आठवी सरसकट पास करता येणार नाही.
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ही सूचना केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळा केंद्रद्वारे चालवल्या जाणार 3000 पेक्षा अधिक शाळांना लागू होणार आहे. जर एखादा विद्यार्थी नापास झाला, तर त्याला पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.
परंतु जर तो दुसऱ्यांना देखील नापास झाला तर त्याला पुन्हा त्याच इयत्तेत बसावे लागणार आहे. परंतु विद्यार्थी नापास झाला तरी आठवीपर्यंत विद्यार्थ्यांचे नाव शाळेतून काढले जाणार नाही, असे सरकारने सांगितलेले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आता नो डिटेन्शन पॉलिसी संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. येत्या काळात सुरू केलेल्या या व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता वर घातला किंवा पुढे ढकलला असे करून पास झाला असे करता येणार नाही. खास करून विद्यार्थ्यांचे गुण चांगल्या पद्धतीने वाढू देत विद्यार्थ्यांमध्ये चांगले शिक्षण घेण्याचे मानसिकता येऊ दे यासाठी हे बदल करण्यात येत आहेत.