मित्रांनो,भारत हा लोकसंख्या प्रवण देश आहे. ज्यामुळे नियमित ड्रायव्हिंग करणं जिकरीच ठरतं. केवळ लोकांच्या वर्दळीमुळे नव्हे तर मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर असल्याने देखील घडू शकते. 2019 च्या आकडेवारीनुसार भारतातील रस्त्यावरील अपघातांची एकूण संख्या 4,37,396 होती ज्यामध्ये 1,54,732 लोक मृत्यू पावले. हे आकडे चिंताजनक असण्यासोबत तुमच्या वाहनाला किंवा शरीराला कोणतेही नुकसान झाल्यास काही प्रकारचे बॅक-अप असणे आवश्यक असल्याचे देखील यामधून सूचित होते.
बँकेत नोकरीची संधी, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज
म्हणून, जेव्हा तुम्ही बाईक खरेदी करता, तेव्हा बाईक इन्श्युरन्स खरेदी करणेही सर्वोत्तम आहे. हे केवळ फायदेशीर नाही तर मोटर वाहन कायद्यानुसार किमान अनिवार्य असेल. जर तुम्हाला बाईक इन्श्युरन्स कसे काम करते आणि बाईक अपघातासाठी इन्श्युरन्सचा क्लेम कसा करावा हे जाणून घ्यायचे असेल तर! आजच्या या लेखामध्ये आपण त्या सर्व बद्दलची माहिती पाहणार आहोत.
उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय झटपट कर्ज देणारे नवीन ॲप : अर्जेंट कर्ज
दुर्दैवाने, जर रस्त्यावर तुम्हाला अपघाताला सामोरे जावे लागल्यास चिंता करू नका. लक्षात ठेवा की तुमची पॉलिसी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या बॅक-अप करण्यासाठी आहे. तुम्हाला करावयाची एकमेव गोष्ट म्हणजे योग्य स्टेप्स मध्ये तुम्ही क्लेम दाखल करणे होय. बाईक अपघातासाठी इन्श्युरन्सचा क्लेम कसा करावा हे जाणण्यापूर्वी बाईक इन्शुरन्स चे प्रकारांविषयीची माहिती पाहूया. मूलभूतपणे, बाईक इन्श्युरन्स क्लेम दोन प्रकारचे आहेत.
जर्मनी मोफत शिक्षण संपवत आहे?जर्मनीमध्ये आणखी विनामूल्य अभ्यास नाही?
कॅशलेस क्लेम: अनिलची बाईक अपघातात नुकसानग्रस्त झाली. त्याला त्याच्या बाईकची दुरुस्ती करायची आहे मात्र कोणत्याही व्यावसायिक दुरुस्तीच्या दुकानाविषयी माहिती नाही. त्यामुळे, तो त्याच्या इन्श्युरन्स प्रोव्हायडरशी संपर्क साधतो ज्यांच्याकडे विविध बाईक दुरुस्तीच्या दुकानासह टाय-अप आहे. अनिलला केवळ एक लहान अनिवार्य कपातयोग्य रक्कम भरून त्याची बाईक दुरुस्त करून मिळाली; नंतर दुरुस्तीच्या दुकानात थेट प्रोव्हाडयरने पैसे दिले होते.दुरुस्तीच्या दुकानात संपूर्ण रक्कम भरण्याची गरज नसलेल्या या परिस्थितीला कॅशलेस क्लेम म्हणून ओळखले जाते.
Personal Loan: हवे तेवढेच कर्ज अर्जेंट उपलब्ध : वाचा होम क्रेडिट पर्सनल लोन कसे घ्यावे ?
प्रतिपूर्ती क्लेम: अनिलचा मित्र कपिलला दुरुस्तीच्या दुकानाची माहिती होती. त्यामुळे त्यांनी अनिलला त्या दुकानात त्याची बाईक दुरुस्त करण्याची शिफारस केली. अनिलने त्याची बाईक घेतली आणि त्याच्या नुकसानग्रस्त बाईकची दुरुस्ती केली आणि त्याने त्याच्या खिशातून पैसे भरून दुकानातून बिल घेतले. त्यानंतर, तो सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स आणि त्याच्या दुकानातून गोळा केलेल्या बिलांसह क्लेम दाखल करतो. इन्श्युरन्स कंपनीने अनिलला पैशांची प्रतिपूर्ती केली.तुमच्या स्वत:च्या खिशातून त्यासाठी पैसे भरल्यानंतर प्रतिपूर्तीचा क्लेम करण्याची ही पद्धत प्रतिपूर्ती क्लेम म्हणून ओळखली जाते. यामध्ये, इन्श्युरर तुम्हाला कव्हरेज मर्यादा पेक्षा अधिक देय करणार नाही.जर बाईकचे अपघात झाले किंवा नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले तर प्रथम त्याविषयी इन्श्युररला सांगा.
Bajaj Finserv Personal Loan … बजाज फिन्सर्व मधून 1.5 लाखाचे कर्ज कसे घ्यावे…संपूर्ण माहिती पहा..
जर अपघाती नुकसान झाले तर एफआयआर देखील दाखल करा. एकदा इन्श्युररला सूचित केल्यानंतर, नुकसान तपासण्यासाठी सर्व्हेअर पाठवला जाईल. यानंतर; इन्श्युरर बाईकच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करेल. जर तुम्हाला तुमच्या आवडीच्या स्वतंत्र दुरुस्तीचे काम निवडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या खिशातून शुल्क भरावे लागेल जे नंतर परतफेड केले जाईल. जर तुम्ही इन्श्युररने निवडलेली दुरुस्ती दुकान निवडले तर तुम्हाला तुमच्याकडून कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
बाल संगोपन योजना…. मिळणार दर महिना 2250 रुपये…
इन्श्युरन्स क्लेम मिळविण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स काय आहेत? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर क्लेम फॉर्म, रजिस्ट्रेशन,टॅक्स पेमेंट पावती, वाहन परवाना, एफआयआरची प्रत,इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स, दुरुस्तीचे बिल इत्यादी डॉक्युमेंट्स आवश्यक असतील तरच तुम्ही या इन्शुरन्सचा क्लेम मिळवू शकता.
‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 60 हजार रुपये : सविस्तर वाचा ‘ही’ योजना : Scholarship
अशाप्रकारे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या बायक इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये जाऊन देऊ शकता व तुम्हाला बाईक इन्शुरन्सचे जे काही खर्च झाला असेल तो इन्शुरन्स मार्फत दिला जाईल.