आरोग्य विमा सुद्धा विकणार आता LIC, कंपनीची योजना काय, सीईओंनी केला मोठा खुलासा

मित्रांनो देशामध्ये सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसी आता आरोग्य विभाग क्षेत्रामध्ये दमदार पाऊल टाकण्याच्या तयारीमध्ये आहे आरोग्य क्षेत्रासाठी नवीन विभाग सुरू करण्यापेक्षा एलआयसी आता आरोग्य विमा विक्री करणारी कंपनी आदी ग्रहण करण्याच्या विचारात आहे.

सिबिल स्कोअर शिवाय असे घ्या अर्जंट कर्ज : 101 टक्के कर्ज उपलब्ध करून देणारा मार्ग

देशामध्ये सध्या पाच प्रमुख विमा कंपन्या स्टार हेल्थ अँड एलाईड इन्शुरन्स निवा बूपा आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स केअर हेल्थ इन्शुरन्स आणि माणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स काम करत आहेत विमा निया मक IRDAI ने दोन विमा कंपन्या गॅलेक्सी हेल्थ आणि नारायण हेल्थ यांना परवानगी दिली आहे

एका कंपनीचा ताबा घेऊ शकतो

Muthut Finance : मुथूट फायनान्स : पर्सनल लोन झटपट देणारा सोपा मार्ग : अर्जंट कर्ज मिळेल

एलआयसीचे एमडी आणि सीईओ सिद्धार्थ मोहंती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. एलआयसीच्या जून तिमाहीचे निकाल त्यांनी जाहीर केले. त्यावेळी त्यांनी आरोग्य विमा क्षेत्रात दमदार पाऊल टाकण्याविषयी एक महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानुसार, एका कंपनीचा ताबा घेतल्या जाऊ शकतो, त्यामुळे एलआयसीला देशभरात आरोग्य विमा विक्रीची परवानगी मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षातच आरोग्य विमा कंपनीच्या अधिग्रहणाचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे या एक दोन महिन्यातच आरोग्य विमा कंपनी खरेदी करुन लागलीच आरोग्य विमा क्षेत्रात मांड ठोकण्याचा एलआयसीचा प्रयत्न असेल.

कर्ज ॲप जलद मंजूरी 2024 : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज ॲप : खराब CIBIL स्कोर कर्ज

 

14 लाखांहून अधिक एजेंट

 

एलआयसीकडे जवळपास 14.1 लाखांहून अधिक एजेंट आहेत. जगातील मोठ्या विमा कंपनी नेटवर्कसारखाच हा मोठा आकडा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एलआयसीचे काही एजेंट हे अगोदरच दुसऱ्या आरोग्य विमा कंपनीसाठी काम करत आहेत. नियमानुसार एजेंट हा जीवन विमा सोबत इतर विमा कंपनीसाठी काम करु शकतो. आता एलआयसी आरोग्य विमा विक्रीत उतरली तर एजेंटला मोठा फायदा होऊ शकतो. तर ग्राहकांचा एलआयसीवर अजूनही विश्वास कायम असल्याने ग्राहक जोडण्यासाठी मोठी अडचण येणार नाही.

महिलांसाठी 50 विविध योजना : जाणून घ्या लाभ, अर्ज, कागदपत्रे सविस्तर माहिती

इतका झाला फायदा

 

जून 2024 च्या संपलेल्या तिमाहीत भारतीय आयुर्विमा महामंडळाचा निव्वळ नफा 10 टक्क्यांनी वाढला. तो 10,461 कोटींच्या घरात पोहचला. तर या कालावधीत कंपनीचा महसूल वाढून 2,10,910 कोटी रुपये झाला. तर गुंतवणुकीतून एलआयसीला 96,183 कोटींचा महसूल मिळाला. गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा याच कालावधीसाठी 90,309 कोटींच्या घरा होता.

हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय?