Post office Insurance : आजारी पडल्यावर पैसे मिळतील का ? पोस्ट ऑफिस विमा सर्व प्रश्नांची उत्तरे

Post Insurance :  मित्रांनो असे म्हटले जाते की पोस्टाची गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे. याच पोस्ट ऑफिस द्वारे अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ देखील घेता येतो. पोस्ट ऑफिस द्वारे विमा देखील काढला जातो. यातीलच एक म्हणजे पोस्ट ऑफिस द्वारे अपघाती विमा काढला जातो. या अपघाती विमा बद्दल अनेकांना प्रश्न असतात की अपघात झालाच नाही तर पैसे परत मिळणार का ? नैसर्गिक मृत्यू झाल्यास १० लाख मिळतील का ? विमा काढल्यावर किती दिवसांनी विमा लागू होतो ? आजारी पडल्यावर पैसे मिळतील का ?विम्याचा प्रिमियम रूपये ३९९ किती वर्षे भरायचे ? या सर्व प्रश्नांचे उत्तर आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

Post office Insurance त्यातील पहिला प्रश्न म्हणजे अपघात झालाच नाही तर पैसे परत मिळतात का? या अंतर्गत आपल्याकडून वार्षिक 399 चा हप्ता हा घेतला जातो. जर आपला कोणता अपघात झालाच नाही तर या द्वारे आपल्याला पैसे हे दिले जात नाही. जेव्हा आपला कोणता अपघात होईल तर त्या विम्याचा अंतर्गत जे काही रक्कम असेल तर ती आपल्याला मिळते.

Post office Insurance :

दुसरा प्रश्न म्हणजे नैसर्गिक मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये मिळतील का?

हा विमा अपघाती विमा असल्याने जर तुमचा मृत्यू कोणत्या अपघाताने झाला असल्यास तुमच्या घरातील व्यक्तींना दहा लाख रुपये मिळतात. परंतु जर तुमचा मृत्यू आजाराने किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ या अंतर्गत दिला जात नाही.

पुढील प्रश्न म्हणजे विमा काढल्यावर किती दिवसांनी विमा लागू होतो?

ज्या दिवशी पासून त्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तीनशे रुपयाचा हप्ता भरता. त्या दिवसाच्या त्या क्षणापासून तुम्हाला हा विमा लागू होतो. पुढील प्रश्न म्हणजे आजारी पडल्यास या विमा अंतर्गत पैसे मिळतील का? हा अपघाती विमा असल्याकारणाने तुम्ही जर आजारी पडला असाल तर याद्वारे तुम्हाला कोणतीही रक्कम या विमा अंतर्गत दिली जात नाही.

पुढील प्रश्न म्हणजे विम्याचा प्रिमियम रूपये ३९९ किती वर्षे भरायचे ?

हा विमा वार्षिक असतो यात फक्त 399 रुपये वर्षाला भरावे लागतात आणि पुढील वर्ष जर आपल्याला हा विमा भरायचा असेल तर तो पुन्हा रिन्यू करून घ्यावा लागतो. त्याचबरोबर या विम्याची वयोमर्यादा ही 18 ते 65 वर्ष आहे. म्हणून तुम्ही वयाच्या 65 वर्षापर्यंत हा विमा रिन्यू करून घेऊ शकता. एका IPPB अकाउंट वरून घरातील किती सदस्यांचा विमा काढता येईल ? जर जर पती किंवा पत्नीचे अकाउंट असेल तर पती पत्नी या दोघांचे या आकाऊंट वरून दोन विमा काढता येतात. मुलांचे काढायचे असेल तर त्यासाठी सेपरेट अकाउंट काढावे लागेल.

दुसऱ्या बँकेत PMJJBY काढून असल्यावर पोस्टाचा हा अपघात विमा काढता येईल का ?

जर तुमच्या दुसऱ्या बँकेमध्ये pmjjby काढून असल्यावर पोस्टाचा हा अपघाती विमा तुम्हाला काढता येतो. विम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मुलांना शिक्षण खर्च केव्हा मिळेल ? जेव्हा त्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू झाला असेल किंवा त्या व्यक्तीला पॅरालिसिस मारला असेल त्यावेळी त्याच्या मुलांना शिक्षण खर्च हा दिला जातो. अपघात झाल्यानंतर उपचार कोणत्या दवाखान्यात घ्यायचा ? तुम्ही कोणताही दवाखान्यातून उपचार घेऊ शकता.

घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन विमा काढता येईल का ? घरबसल्या मोबाईल वरून ऑनलाईन विमा काढता येत नाही. यासाठी शासनाचे काही नियम आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागते.विमा काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ? विमा काढण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि पैसे इत्यादीची आवश्यकता आहे. हे तुम्ही तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन हा विमा लगेचच काढू शकता.

हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्यास १० लाख मिळेल का ? जर हार्ट अटॅक घेऊन मृत्यू झाल्यास तुम्हाला या विमा बद्दलचे असलेले दहा लाख रुपये मिळणार नाही. हा अपघाती विमा असल्याकारणाने ते पैसे दिले जात नाही. कुटुंब प्रमुखाने विमा काढल्यास कुटूंबातील सर्व सदस्यांना विमा लागू राहील का ? जर हा विमा प्रचंड प्रमुखांनी काढला असेल तर तो त्याचा एकटा पुरताच राहील. दुसऱ्या सदस्यांना हा विमा लागू होत नाही.

अशाप्रकारे पोस्ट ऑफिस च्या अपघाती विमा बद्दलची असलेली प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेले आहेत.