राज्यातील अंगणवाडी मदतनिसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनिसांची १३ हजार ९०७ पदे रिक्त आहेत. राज्यातील या सर्व १४,६९० पदभर्तीसाठी नवीन जाहिराती लवकरच प्रकाशित होणार आहे.