Cidco : सिडको : 48 विविध पदांची भरती : पहा माहिती
सिडको : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)
नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ‘सिडको’ महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी
‘सिडको’ या भारतातील ख्यातनाम नगर नियोजन संस्थेने महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई व विविध नवीन शहरांचे शिल्पकार अशी जागतिक पातळीवर ओळख निर्माण केली आहे. दर्जेदार गृहनिर्माण सुविधा, नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधा, परिवहन सेवा, आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क आदी वैविध्यपूर्ण नागरी विकास प्रकल्पांच्या माध्यमातून नगर नियोजनाची व विकासाची अनुभूती येत आहे.
सिडको तर्फे वर्ग-१ व २ मधील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांचा तपशील पुढीलप्रमाणे:-
१. सहयोगी नियोजनकार एस-२३, रु. ६७,७००-२,०८,७००/-
• वर्ग : ०१
• एकूण रिक्त पदांची संख्या : ०२
• आरक्षण : अ.जा.-१, वि.जा.(अ)-१
२. उपनियोजनकार : एस-२०, रु. ५६,१००-१,७७,५००/-
• वर्ग : ०१
• एकूण रिक्त पदांची संख्या : १३
• आरक्षण : अ.ज.-१, वि.जा. (अ)-१, भ.ज. (क)-१, साशैमाव-१, आ.दु.घ.-१, खुला-८
३. कनिष्ठ नियोजनकार: एस-१५, रु. ४१,८००-१,३२,३००/-
• वर्ग : ०२
आ.दु.घ.-१, खुला-४
• एकूण रिक्त पदांची संख्या : १४ • आरक्षण : अ.जा.-२, अ.ज.-१, वि.जा.(अ) १, भ.ज. (ब)-१, इ.मा.व. ३, साशैमाव-१,
४. क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ): एस-१५, रु. ४१,८००-१,३२,३००/-
• वर्ग : ०२
• एकूण रिक्त पदांची संख्या : ०९
• आरक्षण : अ.जा.-१, अ.ज.-१, इ.मा.व. २, साशैमाव-१, आ.दु.घ.-१, खुला-३
भरतीप्रक्रियेच्या टप्प्यावर आरक्षित / अराखीव पदांमध्ये बदल (कमी/अधिक/बजा) होऊ शकतो याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी.
विस्तृत जाहिरात, पात्रता निकष आणि अटी व शर्ती इत्यादी माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर
‘career’ या सेक्शन अंतर्गत नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येईल.
www.cidco.maharashtra.gov.in