डीमार्ट ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. देशभरातील लाखो ग्राहक दररोज दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी डीमार्टच्या स्टोअर्समध्ये भेट देतात.
ग्राहकांप्रमाणेच कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेते हे फार कमी लोकांना माहीत आहे. डीमार्टने मिळवलेलं यश हे केवळ प्रभावी व्यवस्थापनामुळे नाही तर तिथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचं फळ आहे.
डीमार्ट आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ दरमहा पगारासोबत त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसह अनेक अतिरिक्त सुविधा आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लाभ उपलब्ध करून दिला आहे. डीमार्टमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) अंतर्गत रक्कम कपात केली जाते. विशेष म्हणजे, कंपनी देखील त्याच प्रमाणात योगदान देते. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एक मोठी आर्थिक मदत मिळते. दीर्घकालीन नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा फायदा मानला जातो.
ग्रॅच्युइटीचा लाभ Graututy
डीमार्टमध्ये सलग पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा हक्क मिळतो. निवृत्तीच्या वेळी ही रक्कम मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यातील योजना आखण्यास मदत होते.
कंपनी आपल्या मेहनती कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना दरवर्षी कामगिरीवर आधारित बोनस देखील देते. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होतो ज्यामुळे त्यांच्यामध्ये काम करण्याची प्रेरणा अधिक वाढते.
आरोग्य विमा सुविधा Health Insurance
वैद्यकीय खर्चाचा वाढता भार लक्षात घेता डीमार्ट अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य विमा सुविधा देते. यामुळे अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चाची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होते.
स्टोअर खरेदीवर खास सवलत Big Discount
डीमार्ट कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या स्टोअरमधून किराणा आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर विशेष सवलत दिली जाते. यामुळे कर्मचाऱ्यांचा महिन्याचा घरगुती खर्च कमी होण्यास मदत होते.
करिअर ग्रोथ आणि पदोन्नतीच्या संधी Carrier Groth
डीमार्ट आपल्या कर्मचाऱ्यांच्या करिअर विकासावर विशेष भर देते. वेळोवेळी प्रशिक्षण आणि कौशल्यविकास कार्यक्रम राबवले जातात, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते.
त्यामुळे डीमार्ट ही केवळ एक रिटेल कंपनी नसून ती कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित भविष्याचा विचार करणारी संस्था म्हणूनही ओळख निर्माण करत आहे. त्यामुळेच आज डीमार्टमध्ये काम करणं हे अनेक तरुणांसाठी स्थिर आणि विश्वासार्ह करिअरचा पर्याय मानला जात आहे.