Indian Post Recruitment 2025: भारतीय पोस्ट खात्यात 25 हजार 200 पदांची भरती

Indian Post Recruitment 2025: भारतीय पोस्ट खात्यात 25 हजार 200 पदांची भरती

आता सरकारी नोकरीची शोधात असणाऱ्यांना मोठी खुशखबर मिळाली आहे. भारतीय टपाल खात्याने ग्रामीण डाक सेवकांच्या सुमारे 25 हजार 200 पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नसून गुणवत्तेच्या आधारे म्हणजेच मेरिटनुसार भरती करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती

या भरती प्रक्रियेत सामान्य, ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटक (EWS) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र, अनुसूचित जाती/जमाती (SC/ST), महिलांसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज मोफत राहील.

Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 10,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. याशिवाय अतिरिक्त भत्तेही मिळतील. दरम्यान, या भरतीबाबतच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी इच्छुकांनी संबंधित अधिकृत प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवावे. तसेच वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

 

भरतीसाठी 3 मार्च 2025 पासून अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in येथे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पात्रता व अधिक माहिती वरील वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध होईल.