सैन्य भरती सुरू : असा करा अर्ज ; जाणून घ्या माहिती

भारतीय सैन्यांतर्गत एनसीसी (NCC) स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत 58 वा कोर्स (ऑक्टोबर 2025) साठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया 14 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. (Job Requirement) अर्जाची अंतिम तारीख 15 मार्च 2025 आहे. 

 

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

 

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 14 फेब्रुवारी 2025

 

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 15 मार्च 2025

 

अर्ज पद्धत: ऑनलाईन

 

अधिकृत संकेतस्थळ: joinindianarmy.nic.in

 

दरम्यान, एनसीसी स्पेशल एंट्री स्कीमच्या या संधीबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत PDF जाहिरात पाहावी.