चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. भारतीय नौदलात विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजेच एसएससी अंतर्गत अधिकारी पद 2026 ची भरती जाहीर झाली आहे. ही भरती जानेवारी 2027 कोर्स (एसटी 27) साठी आहे. याअंतर्गत एकूण 260 जागा उपलब्ध आहेत. यात पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही संधी असणार आहे. पण ते अविवाहित असावेत लागतात. ही संधी देशसेवेसाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी उत्तम आहे. नौदलात विविध शाखांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
पदभरतीचा तपशील
या नौदल भरतीत विविध शाखांमध्ये जागा वाटल्या आहेत. कार्यकारी शाखेत 76 जागा, पायलटसाठी 25, नौदल हवाई ऑपरेशन अधिकारीसाठी 20, एअर ट्रॅफिक कंट्रोलरसाठी 18, लॉजिस्टिक्ससाठी 10, शिक्षण शाखेसाठी 15, अभियांत्रिकी शाखेसाठी 42, इलेक्ट्रिकल शाखेसाठी ३८, सबमरीन तांत्रिक अभियांत्रीकीसाठी 8 आणि सबमरीन तांत्रिकसाठी 8 जागा आहेत. प्रत्येक शाखेनुसार शिक्षण आणि वयाची अट वेगळी आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तपासणी करा.
पात्रता निकष
या भरतीसाठी पात्रता निकष सोपे आहेत पण ते पदानुसार वेगळे आहेत. उमेदवार अविवाहित पुरुष किंवा स्त्री असावेत. वयाची मर्यादा प्रत्येक पदासाठी वेगळी आहे. शिक्षणाची पात्रता देखील पदानुसार बदलते याची नोंद घ्या. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये याचा सविस्तर तपशील देण्यात आलाय.अर्जदारांनी स्वतःची पात्रता तपासूनच अर्ज सादर करावा, अन्यथा तो रद्द होऊ शकतो.
अर्ज प्रक्रिया
नौदल भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. मुख्य पृष्ठावर अर्ज दुवा क्लिक करा. प्रथम नोंदणी करा, नंतर लॉगिन करून फॉर्म भरा. फॉर्म तपासा, शुल्क भरून सबमिट करा. अर्जाची प्रत डाउनलोड करून प्रिंट घ्या. इतर काही माहिती हवी असल्यास वेबसाइट पहा. ही प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक आहे.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 24 जानेवारी 2026 आणि शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2026 आहे. या कालावधीतच अर्ज करा अन्यथा संधी हुकू शकते. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेचे तपशील दिलेले नाहीत पण सामान्यतः नौदलाच्या भरतीत परीक्षा, मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी असते. उमेदवारांनी अधिकृत सूचना https://www.joinindiannavy.gov.in/files/Advertisement_SSC_Jan_2027.pdf वरून डाउनलोड करावी. देशसेवेसाठी ही उत्तम संधी आहे पण सर्व अटी पूर्ण करूनच अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे.