SBI मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, फक्त अर्ज करताना..

सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी बरेच तरुण प्रयत्न करत असतात. अशात, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मोठ्या पदांसाठी भरती जाहीर केल्याची बातमी समोर आली आहे. SBI ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 29 मे 2025 असून इच्छुक उमेदवारांनी त्वरीत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.

 

अर्ज करण्यासाठी तुम्हाला sbi.co.in या SBI च्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन किंवा थेट ibpsonline.ibps.in/sbicboapr25 वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही संधी खास आहे.

 

शैक्षणिक पात्रता

 

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी. ज्या तरुणांनी वैद्यकीय (मेडिकल), अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग) किंवा सीए (CA) चे शिक्षण घेतले असेल ते तरुण देखील यासाठी पात्र असतील. या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान 2 वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

 

वयोमर्यादा

 

या भरतीसाठी 21 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल, जी सरकारी नियमांनुसार लागू असेल.

 

अर्ज करण्यासाठी शुल्क

 

यासाठी जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागेल. तर एससी (SC)/एसटी (ST)/पीएच (PH) प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. यासाठीचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

 

कसा कराल अर्ज?

 

1. सर्वप्रथम ibpsonline.ibps.in/sbicboapr25/ या अधिकृत वेबसाइटवर जा.

 

2. होमपेजवर “Click here for New Registration” वर क्लिक करा.

 

3. यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करा.

 

4. आता उर्वरित माहिती भरून लक्षपूर्वक अर्ज प्रिव्ह्यू करा.

 

5. अर्जाचे शुल्क भरून अर्ज सबमिट करा.

 

6. शेवटी अर्जाची प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.