‘DRDO’ मध्ये सहभागी व्हा! ‘डिप्लोमा-डिग्री’धारक उमेदवारांसाठी नवी भरती…

सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) शी संलग्न असलेल्या ISSA संस्थेने एक वर्षाच्या अप्रेंटिसशिपसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी संस्थेत अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी या भरती मोहिमेंतर्गत एक चांगली संधी आहे. या भरतीसाठी पदवीधर आणि डिग्रीधारक उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरतील.

 

या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ईमेलद्वारे आहे. यासाठी, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचा अर्ज स्कॅन करून ईमेलद्वारे पाठवावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2026 असून या तारखेनंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

 

‘या’ पदांसाठी भरती

 

ISSA कडून जाहीर झालेल्या नोटिफिकेशननुसार, या भरतीअंतर्गत एकूण 21 रिक्त पदे भरली जातील. या भरतीमध्ये पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निकल अप्रेंटिस या पदांचा समावेश असून या पदासाठी कंप्यूटर सायन्स आणि गणिताची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल.

 

1. ग्रॅज्युएट अप्रेन्टिस (कंप्यूटर विज्ञान एवं इंजीनियरिंग) – 15 पदे

 

2. ग्रॅज्युएट अप्रेन्टिस (गणित) – 1 पदे

 

3. टेक्निशिअन अप्रेन्टिस (डिप्लोमा, कंप्यूटर सायन्स) – 5 पदे

 

किती मिळेल पगार?

 

ग्रॅज्युएट अप्रेन्टिस : दरमहा 12,300 रुपये

 

टेक्निशिअन अप्रेन्टिस : दरमहा 10,900 रुपये

 

काय आहे पात्रता?

 

– ग्रॅजुएट अप्रेन्टिस (कंप्यूटर सायन्स आणि इंजीनियरिंग): या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कंप्यूटर सायन्स आणि इंजीनिअरिंग क्षेत्रांत B.E. किंवा B.Tech ची डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, ही डिग्री पूर्णवेळ, नियमित अभ्यासक्रमातून प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.

 

– ग्रॅज्युएट अप्रेन्टिस (गणित): या पदासाठी उमेदवारांकडे गणित विषयात M.Sc ची डिग्री असणं आवश्यक आहे. ही पदवी पूर्णवेळ, नियमित अभ्यासक्रमातून प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे.

 

– टेक्निशिअन अप्रेन्टिस (डिप्लोमा, संगणक सायन्स): या पदासाठी उमेदवारांकडे राज्य किंवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त संस्थेतून कंप्यूटर सायन्स विषयातील डिप्लोमा असणं आवश्यक आहे. तसेच, डिप्लोमा पूर्णवेळ आणि नियमित असणं गरजेचं आहे.

 

2021, 2022, 2023, 2024 किंवा 2025 मध्ये पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र असतील. तसेच, ज्या उमेदवारांनी अप्रेंटिसशिप कायदा 1961 अंतर्गत आधीच प्रशिक्षण पूर्ण केलं आहे किंवा सध्या प्रशिक्षण घेत आहेत ते या भरतीसाठी पात्र नसतील. याशिवाय, किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असलेले उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत.

 

कसा कराल अर्ज?

 

1. सर्वप्रथम अधिकृत जाहिरात क्रमांक ISSA/HRD/Apprentice/2026/01 मध्ये दिलेला अर्ज फॉर्म डाउनलोड करा.

2. फॉर्मची प्रिंट काढून तो सुबक अक्षरात भरा आणि त्यात सर्व योग्य माहिती भरा.

3. सर्व आवश्यक दस्तऐवजांच्या स्कॅन केलेल्या कॉपी तयार करा.

4. आता भरलेला अर्ज आणि डॉक्यूमेंट्स दिलेल्या ईमेल अॅड्रेसवर पाठवा.