रेल्वेत सर्वात मोठी भरती! २२,००० पेक्षा जास्त पदे भरणार; अर्जप्रक्रिया सुरु; पगार किती मिळणार? वाचा

रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वेत सध्या ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी निवड कशी होणार, पगार किती असणार असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

 

पगार किती मिळणार? (Railway Group D Salary)

 

रेल्वेत एकूण २२,१९५ पदांसाठी भरती होणार आहे.रेल्वेमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना बेसिक सॅलरी १८,००० रुपये मिळणार आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर माहिती दिलेली आहे.त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करण्याआधी संपूर्ण माहिती वाचायची आहे.

 

पात्रता

 

रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे. १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. १२ ते ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. याचसोबत आयटीआय पास उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

 

अर्ज कसा करावा?

 

सर्वात आधी तुम्हाला रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या (रीजनल) अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

 

यानंतर होमपेजवर संबंधित लिंकवर क्लिक करा.

 

यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहेत. यानंतर लॉग इन करायचे आहे.

 

यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती भरायची आहे. शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र सबमिट करायचे आहे.

 

यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे. त्याआधी प्रिंटआउट काढून ठेवा.