खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी; या पदांसाठी होणार भरती; अर्ज कसा करावा?

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कोकण रेल्वेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे.कोकण रेल्वेत ट्रेनी अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण १९० रिक्त जागा आहेत. त्यामुळे रेल्वेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही रेल्वेच्या konkanrailway.com वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

 

कोकण रेल्वेतील या नोकरीसाठी भरतीप्रक्रिया २७ जानेवारीपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२६ आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 

पात्रता (Eligibility)

 

कोकण रेल्वेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन करायचे आहे. इंजिनियरिंग डिग्री, डिप्लोमा केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

 

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये फी भरायची आहे. सिविल इंजिनियरसाठी ३० जागा रिक्त आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगसाठी २० तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगसाठी १० जागा रिक्त आहेत. मेकॅनिकल इंजिनियरिंगसाठी २० जागा रिक्त आहेत.उर्वरित जागा या डिप्लोमाधारकांसाठी आहे. त्यामुळे पात्रतेनुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि कागदपत्र पडताळणीद्वारे होणार आहे.