सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बरेच तरुण प्रयत्न करत असतात. त्यापैकी बरेचजण SSC म्हणजेच कर्मचारी निवड आयोगाच्या पदांसाठी प्रयत्नशील असतात. अशा तरुणांसाठी एक चांगली बातमी आम्ही घेऊन आलो आहोत.
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या 8 मोठ्या पदांच्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या नोकऱ्या केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांमध्ये असतील. कोणत्या तारखेपासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे? याबद्दल SSC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती जाहीर केली आहे.
जून महिन्यात ‘या’ पदांसाठी भरती
जून महिन्यात SSC च्या 8 पदांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. कोणत्या पदांसाठी कोणत्या तारखेला अर्ज कराल? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
सेलेक्शन पोस्ट परीक्षा – अर्ज सुरू: 2 जून 2025
स्टेनोग्राफर ग्रेड C और D – नोटिफिकेशन येण्याची तारीख: 5 जून 2025
CGL (संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा) – अर्ज सुरू: 9 जून 2025
संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षा (SSC-JHT)- अर्ज सुरू: 5 जून 2025
दिल्ली पोलीस आणि CAPF मध्ये सब इन्स्पेक्टर पदासाठी भरती – अर्ज सुरू: 16 जून 2025
CHSL (संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा) – अर्ज सुरू: 23 जून 2025
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवलदार भरती – अर्ज सुरू: 26 जून 2025
जूनियर इंजीनियर (सिव्हिल, मैकेनिकल, इलेक्ट्रिकल) – अर्ज सुरू: 30 जून 2025
CBT (कम्प्यूटरवर आधारित परीक्षा)
या सर्व भरतींसाठीची परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात घेतली जाईल. प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये वयोमर्यादा, पात्रता, अर्ज शुल्क आणि परीक्षेचा नमुना यासारखी महत्त्वाची माहिती दिली जाईल.\
परीक्षार्थींनी काय करावं?
जर तुम्ही SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तयारी करत असाल तर आताच सर्व परीक्षांची माहिती तपासून घ्या. दैनंदिन अपडेट्ससाठी SSC ssc.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा आणि अगदी वेळेत अर्ज करा. यावर्षी SSC च्या एकाच वेळी 8 मोठ्या भरती घेण्यात येणार आहे. दहावी, बारावी आणि पदवीधर स्तरावरील उमेदवारांसाठी पदांचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतील.