सरकारी नोकरीची संधी; RRB कडून ALP पदांसाठी मोठी भरती जाहीर

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) ने सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी भरतीची संक्षिप्त अधिसूचना जाहीर केली आहे.

 

या भरतीद्वारे देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण ११,१२७ पदे भरली जाणार आहेत.

 

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) ने सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी भरतीची संक्षिप्त अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण ११,१२७ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जाहीर करण्यात आलेली सूचना ही प्राथमिक स्वरूपाची आहे. सविस्तर अधिसूचना लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये पात्रता, परीक्षा पद्धत, आरक्षण आणि इतर महत्त्वाच्या अटींची सविस्तर माहिती दिली जाईल.

 

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू होईल, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२६ (मध्यरात्र) आहे. इच्छुक उमेदवारांनी rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, उमेदवारांनी किमान दहावी (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित ट्रेडमधील आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी असलेले उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

 

वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे. वयाची गणना ठराविक पात्रता तारखेप्रमाणे केली जाईल. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. निवड प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे. सर्वप्रथम संगणक-आधारित परीक्षा (CBT-१) घेतली जाईल. त्यानंतर दुसरी परीक्षा (CBT-२) होईल. या दोन्ही टप्प्यांत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना पुढे संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी द्यावी लागेल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

 

निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर २ (Pay Level २) अंतर्गत सुरुवातीला सुमारे १९,९०० रुपये मूलभूत वेतन मिळेल. याशिवाय विविध भत्तेही दिले जातील, त्यामुळे एकूण पगार अधिक आकर्षक ठरतो. मोठ्या प्रमाणात पदे उपलब्ध असल्यामुळे आणि पात्रता निकषही तुलनेने सोपे असल्यामुळे ही भरती अनेक तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. इच्छुक