फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार १.४० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

फ्रेशर्स आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नवरत्न कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी कंपनीत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये डेप्युटी इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

 

भारत इलेक्ट्रॉनिक्समधील या नोकरीसाठी तुम्हाला bel-india.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये एकूण ३५ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ मार्च २२६ रोजी सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२६ आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय २८ वर्ष असावे.

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ४०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, एचएआरए, मेडिकल सुविधादेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. ही भरती ५ वर्षांसाठी होणार आहे. पुढे २ वर्षांसाठी हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

 

पात्रता

 

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई/बीटेक/ बीएससी केलेले असावे. सिविल इंजिनियरिंग, बॅचलर ऑफ आर्किटेक्चपमध्ये एमएससी केलेले असावे. या नोकरीसाठी फ्रेशर्स अर्ज करु शकतात. कोणत्याही अनुभवाची गरज नाही.