जलसंपदा विभागात मेगा भरती: १५३४ रिक्त पदांचे सेवानियम तयार, भरती प्रक्रिया सुरू

राज्यात पुन्हा एकदा मेगा नोकर भरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांना त्यांचे आकृतिबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

नोकरभरतीबाबत सरकार कुठेही मागे नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावर भरती करताना कंत्राटी पद्धतीने भरती नको, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागातील भरतीबाबत मोठी माहिती समोर आली असून राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.

 

ही पदे आहेत रिक्त

 

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची डिसेंबर, २०२५ अखेर, १५३४ रिक्त पदे आहेत. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) या सवंर्गाची डिसेंबर, २०२५ अखेर २७८ रिक्त पदे आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गाची डिसेंबर, २०२५ अखेर, १४२ रिक्त पदे आहेत. जलसंपदा विभागाने माहिती अधिकारात ही अधिकृत माहिती दिली आहे.

 

सेवानियम तयार झाल्यावर भरती

 

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील प्रकरण १ मधील कलम २ (च) (झ) व (त्र) अन्वये या कायद्यान्वये द्यावयाची माहिती, अभिलेख व माहितीचा अधिकार यांच्या व्याख्या नमूद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शासनाच्या अभिलेख्यावर उपलब्ध माहिती देणे अपेक्षित आहे. सदर माहितीने आपले समाधान न झाल्यास आणि आपणांस अपील करावयाचे असल्यास मंगेश बागडे, अवर सचिव तथा अपिलीय प्राधिकारी, जलसंपदा विभाग, १५ वा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई-४०० ०३२ यांचेकडे ३० दिवसांचे आत करता येईल. तसेच सुधारित सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजित आहे.

 

सरकार भरतीसाठी सकारात्मक

 

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्यात विविध विभागात ७५ हजार नोकर भरतीची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र एक लाखाहून अधिक पदांची भरती करण्यात आली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सरकारच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागांना त्यांचा आकृतिबंध मंजूर करण्याचे तसेच सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मेगाभरतीमध्ये जलसंपदा विभागातील १४ हजार पदांच्या समावेश करण्यात येणार आहे. या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जलसंपदा विभागात जवळपास ४३ आणि २१ अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने अनेकाना नोकरीची संधी मिळणार आहे.