महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे : लिपिक व लघुलेखक पदांसाठी भरती : लगेचच करा अर्ज…

मित्रांनो, जर तुम्ही नोकरी शोधत असाल, तुम्हाला नोकरीच्या आवश्यकता असेल तर आजकाल अनेक क्षेत्रातील जागा भरती चालू आहे. आजचा लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथील लिपिक व लघुलेखक पदासाठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठी कोण कोण पात्र आहे? कोण कोण अर्ज करू शकतो? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 23 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

https://ibpsonline.ibps.in/mscepdec23/

 

ही भरती प्रक्रिया मुख्य लिपिक,वरिष्ठ लिपिक,निम्नश्रेणी लघुलेखक इत्यादी पदांवर होणार असून यामध्ये एकूण 23 रिक्त जागा भरायच्या आहेत. तर या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयामध्ये नियमानुसार सवलत देखील दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्या शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

तसेच टंकलेखन/संगणक टंकलेखन मराठी 30 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट व मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. मूळ जाहिरात मला खाली दिलेल्या लिंक वरून मिळेल. Www.mscepune.in

 

यासाठी लागणारे परीक्षा शुल्क राखीव/मागासवर्गीय/आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग उमेदवारासाठी 850 रुपये तर खुल्या प्रवर्गासाठी 950 रुपये आकारण्यात आलेले आहेत. या उमेदवारांना पगार हा नियमानुसार देण्यात येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या लिंक वरून 8 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. Www.mscepune.in

 

या अंतर्गत उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिली आहे. त्यामध्ये उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत. दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.

 

उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.

भरतीचे इतर सर्व अधिकार MSCE Pune कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

 

अशाप्रकारे जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही देखील याचा अर्थ करू शकता. अर्ज करण्यासाठी वर लिंक देखील दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही आता अर्ज करू शकता.