40 ते 45 हजार पगाराच्या सरकारी नोकरीची संधी; गोमंतकीयांनो GPSC ची जाहीरात आली, येथे करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या गोमंतकीयांसाठी सरकारकडून विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये २४ पदांची भरती केली जाणार आहे.

 

त्यासाठी गोवा लोकसेवा आयोगाने (जीपीएस) विविध सरकारी विभागांमध्ये २४ रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

 

‘या’ पदांसाठी भरती

 

यात ‘आयपीएचबी’मध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्टसाठी २ पदे, ईएसआय योजनेअंतर्गत कनिष्ठ रेडिओलॉजिस्टसाठी १ पद, कृषी विभागात साहाय्यक कृषी अधिकारी – शेती व्यवस्थापकासाठी १७ पदे आणि महिला आणि बाल विभागात अधीक्षक/अधीक्षक – सहप्रोबेशन अधिकारी तसेच प्रोबेशन अधिकारी (महिला) यांसाठी ४ पदे समाविष्ट आहेत.

 

गोवा लोकसेवा आयोगाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहीरातीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. या जाहिरातीत पदासाठी आवश्यक पात्रता, पगार, एकूण पदांची संख्या, वयाची अट यासारख्या सर्व माहीती पाहता येईल.

 

ऑनलाईन पद्धतीने येथे करा अर्ज

 

पात्र उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. gpsc.goa.gov.in आणि cbes.goa.gov.in या संकेतस्थळावरुन उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.