महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग भरती : महिला व पुरुषांना संधी

मित्रांनो, तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि जर तुम्ही महाराष्ट्र शासन शालेय विभागामध्ये नोकरी करू इच्छित असाल तर अशा लोकांसाठी आजच्या लेखांमध्ये आपण महत्त्वाची बातमी सांगणार आहोत. 

 

या महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग याचा काही जागा निघालेल्या आहेत. या जागा कोणकोणत्या आहे? कोण कोण व्यक्ती यामध्ये अर्ज करू शकतो? तसेच याचा अर्ज कसा करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

आजकालच्या जीवनामध्ये नोकरी शिवाय पर्याय उरला नाही. म्हणूनच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या शोधात असतो. आपल्याला असे वाटते की आपण जे नोकरी करत आहोत त्याद्वारे आपल्याला चांगली सॅलरी मिळावी.

 

जेणेकरून आपण त्या पैशातून आपले घर चालउ शकु. आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. त्यासाठीच आज आपण शालेय शिक्षण विभागातील काही जागा निघालेल्या आहेत त्या जागांविषयी माहिती पाहणार आहोत.

 

या मध्ये काही पात्रता आहेत त्या म्हणजे या विभागात अर्ज करणारी व्यक्तीचे शिक्षण हे 10 वी BA, B.sc, B.com, D. ed, B.ed, ATD, MSW, BSW झालेले असावे. या जागेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही. यामध्ये पुरुष व स्त्री दोन्ही देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 इतकी आहे. त्याआधी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

 

या ज्या जागा निघालेल्या आहेत त्या एकलव्य बहुउद्देशीय संस्था, मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियान (प्रौढ शिक्षण) कार्यक्रम शासकीय उपक्रमांसाठी जालना जिल्ह्यात गावनिहाय कंत्राटी स्वयंसेवक पदांची भरती निघालेली आहे. ज्या व्यक्तींचे दहावी शिक्षण झालेले आहे त्या व्यक्तींनी स्वयंसेवकासाठी अर्ज करू शकता. याच्या जागा 50 आहेत. ही व्यक्ती दहावी पास असणे आवश्यक आहे.

 

त्यानंतर स्वयंसेवक पदासाठी ज्या व्यक्तींचे शिक्षण B.A.,B.Sc.,B.com. अशा व्यक्तींसाठी 50 जागा निघालेल्या आहेत. तर स्वयंसेवक पदासाठी ज्या व्यक्तीचे शिक्षण D.ed, A.T.D., B.ed., B.ped., M.S.W., B.S.W. झालेले आहे. अशा व्यक्तींसाठी 100 जागा निघालेल्या आहेत. निरक्षर लाभार्थी यांच्या संख्येनुसार गावनिहाय स्वयंसेवकाची वाढीव पदे भरण्यात येतील व त्यांना गावनिहाय नियुक्ती देण्यात येईल.

 

अर्ज स्विकारण्याची तारीख दिनांक ०१/०४/२०२४ ते दिनांक १५/०४/२०२४ पर्यंत पोस्टाद्वारे स्विकारल्या जातील. अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती, अर्जावर पासपोर्ट फोटो चिटकविलेला असावा. हा अर्ज अध्यक्ष एकलव्य बहुउद्देशीय संस्था, मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा C/o महात्मा गांधी व्यवसमुक्ती केंद्र तळणी, विश्वनाथ विद्यालया शेजारी शिरपूर रोड तळणी ता. मंठा जि. जालना या पत्त्यावर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पोस्टाद्वारे पाठविण्यात यावेत. अशी माहिती या शिक्षण संस्थेकडून देण्यात आलेली आहे.

 

जर कोणी या पदासाठी अर्ज करू इच्छित असेल अशा व्यक्तींनी नक्कीच यासाठी अर्ज करा व तो पोस्टाद्वारे त्या संस्थेला पाठवा.