SSC MTS Havaldar Bharti 2025। १० वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत तब्बल १०७५ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदांसाठी हि भरती होणार असून याबाबतची अधिसूचनाही जाहीर झाली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २६ जून पासून सुरु झाली असून शेवटची तारीख २४ जुलै २०२५ आहे. या भरतीसाठी काय पात्रता असेल? अर्ज कुठे आणि कसा करायचा? वयाची अट किती आहे? या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे जाणून घेऊयात.
शैक्षणिक पात्रता –
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC MTS Havaldar Bharti 2025) माध्यमातून तब्बल १०७५ जागा भरल्या जातील. त्यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदाच्या जागेचा समावेश आहे. त्यासाठी शिक्षणाची पात्रता हि दोन्ही पदासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – SSC MTS Havaldar Bharti 2025
मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी सदर उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे तर हवालदार पदासाठी 18 ते 27 वर्ष वयाची अट असणार आहे. संपूर्ण भारतात कुठेही नोकरीची संधी मिळू शकते. त्यासाठी जास्तीस जास्त विद्यार्थ्यांनी या पदासाठी अर्ज करावा
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क १००/- रुपये ठेवण्यात आलं आहे.
अर्ज कसा करावा ?
अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया (SSC MTS Havaldar Bharti 2025) हि ऑनलाईन असून ऑफलाईन अर्ज कुठेही स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.अपुर्ण कागदपत्रे आणि माहिती दिल्यास उमेदवाराला अपात्र करण्यात येऊ शिकते त्यामुळे अर्ज करताना माहिती काळजी पूर्वक भरली पाहिजे. अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 जुन 2025 आहे.तर अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2025 आहे. या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट – www.ssc.nic.in लाअर्ज करावा.