भारतीय हवाई दलात बंपर भरती; किती मिळेल पगार? जाणून घ्या सविस्तर माहिती…

भारतीय हवाई दलात नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या उमेदवारांसाठी नव्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाकडून अग्निपथ स्किमच्या अंतर्गत अग्निवीर एअर इनटेक 1/2026 पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया 11 जुलै 2025 पासून सुरू करण्यात येणार असून 25 सप्टेंबर 2025 रोजी ऑनलाइन परीक्षा आयोजित केली जाईल. या पदासाठी इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

 

वयोमर्यादा

 

1 जानेवारी 2005 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान वय असलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. याचा अर्थ, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं किमान 17.5 आणि कमाल 21 वर्षे वय असणं अनिवार्य आहे. काही प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

 

शैक्षणिक पात्रता

 

या भरतीमध्ये पात्र असण्यासाठी विद्यार्थ्याने 12 वी परीक्षेत भौतिकशास्त्र (Physics), गणित (Maths) आणि इंग्रजी (English) मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. याव्यतिरिक्त, उमेदवाराकडे मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्यूटर सायन्स इत्यादी ट्रेड्समध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा आणि त्यामध्ये 50 गुण असलेले प्रमाणपत्र असायला हवे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षांच्या फिजिक्स आणि गणित विषयांचा समावेश असलेल्या व्होकेशनल कोर्सेसमध्ये 50 टक्के गुण प्राप्त केलेले असतील, असे परीक्षार्थी भरतीसाठी अर्ज करु शकतात.

 

कशी होईल निवड?

 

अग्निवीर हवाई दलाच्या भरतीसाठी आधी लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी (PST/PET), डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल तपासणी करण्यात येईल. या सगळ्या टप्प्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम मेरिट लिस्ट बनवली जाईल.

 

किती मिळेल वेतन?

 

अग्निवीर हवाई दलाच्या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला 30,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. त्यानंतर चौथ्या वर्षापर्यंत हा पगार 40,000 रुपये मासिक इतका होईल. याव्यरिक्त, सेवा निवृत्ती झाल्यानंतर अग्निवीरांना जवळपास 10.08 लाख रुपयांची सेवा निधी टॅक्स फ्री देण्यात येईल.

 

कसा कराल अर्ज?

 

अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर ‘New Registration’ वर क्लिक करुन आवश्यक डिटेल्स भरा आणि रजिस्ट्रेशन करा.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करा आणि अर्ज भरा.

त्यानंतर पासपोर्ट साइज फोटो, सही असे डॉक्यूमेंट्स अपलोड करा.

अर्जाचे शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा.

अर्जाची प्रिंटआउट काढून भविष्यासाठी सुरक्षितरित्या जपून ठेवा.