१० वी उत्तीर्ण असणाऱ्या आणि सरकारी नोकरीची स्वप्ने बघणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेअंतर्गत तब्बल ९०४ पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. हि भरती अप्रेंटिस पदांसाठी असून यासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२५ आहे. या भरतीसाठी पात्रता निकष काय आहे? निवड प्रक्रिया कशी आहे आणि अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात…..
कोणती पदे भरली जाणार –
रेल्वेच्या या भरती अंतगत फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर मेकॅनिक, प्रोग्राम अँड सिस्टीम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, मशीनिस्ट, टर्नर, कारपेंटर, पेंटर हि पदे भरली जाणार आहेत.
कोणत्या विभागात किती पदे – South Western Railway Recruitment 2025
हुबली डिवीजनमध्ये १२५ पदे भरली जाणार आहेत. कैरिज रिपेअर वर्कशॉप हुबलीमध्ये ११२ पदे, बंगळुरु डिविजनमध्ये ११२ पदे, म्हैसूर डिवीजनमध्ये ९१ पदे, सेंट्रल वर्कशॉप मैसूर येथे २३ पदे भरती केले जाणार आहेत.
पात्रता निकष-
उमेदवार मान्यताप्राप्त मंडळातून किमान ५०% गुणांसह १० वी किंवा त्याच्या समकक्ष (१०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत) ITI उत्तीर्ण असावा आणि सदर उमेदवाराकडे NCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित व्यापारात राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा NCVT/SCVT द्वारे जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय अधिसूचनेच्या शेवटच्या तारखेला १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. South Western Railway Recruitment 2025
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क १००/- रुपये ठेवण्यात आलं आहे. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून हे पैसे भरू शकता. मुक्त श्रेणी साठी म्हणजेच SC (अनुसूचित जाती), ST (अनुसूचित जमाती), PwBD (बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती) आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्कआकारले जात नाही.
निवड प्रक्रिया कशी आहे ?
सर्व पात्र अर्जदारांसाठी तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित निवड केली जाईल. गुणवत्ता यादी खालील गुणांची सरासरी घेऊन तयार केली जाईल
किमान ५०% गुणांसह मॅट्रिक (१०वी) आणि
संबंधित ट्रेड मधील ITI गुण.
कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.
मॅट्रिक आणि आयटीआयच्या गुणांच्या सरासरी वरून निवड केली जाणार आहे.
असा करा अर्ज –
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या: rrchubli.in
होमपेजवरील ‘Register’ टॅबवर क्लिक करा
नवीन वापरकर्त्यांसाठी, आवश्यक तपशीलांसह नोंदणी पूर्ण करा
Log In करा आणि तुमच्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि व्यापार-विशिष्ट तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा
स्कॅन केलेले कागदपत्रे अपलोड करा
अर्ज शुल्क भरा
सर्व तपशील नीट चेक करा आणि फॉर्म सबमिट करा
भविष्यातील संदर्भासाठी पेज डाउनलोड करा आणि प्रिंट करा