राज्यात 11 हजार पोलिस भरती : मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती 

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांना आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यात आता 11000 पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात दिली. गेल्या तीन वर्षात 38 हजार 802 पदांची भरती झाल्याची देखील त्यांनी यावेळी सांगितले.

 

माहिती देताना त्यांनी सांगितले आहे की राज्यात 11000 पोलीस भरती केली जाणार आहे याच्या मान्यतेसाठी आलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आले असून गृह विभागाने जिल्हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ही भरती ऑक्टोबर 2025 मध्ये सर्वात होईल असा देखील अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

 

Police Bharati 2025 : या प्रक्रियेत सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येईल या भरतीमध्ये बँड्समन चालक शिपाई पोलीस शिपाई तसेच राज्य राखीव पोलीस दलातील अंमलदार यांचा समावेश असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

 

या भरतीच्या वेळेला आपणाला जो उमेदवार ज्या जिल्ह्यातील आहे तो तेथील रहिवासी असावा अशी अट देखील असल्याचे समजते.