नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एयरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. एएआय (एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया)मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये आयटीआय अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
असा करा अर्ज (How To Apply)
जर तुम्हाला आयटीआर अप्रेंटिस पदासाठी अर्ज करायचे असेल तर apprenticeshipindia.org या पोर्टलवर जाऊन अर्ज करायचे आहे. तसेच ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NATS पोर्टल nats.education.gov.in यावर जाऊन अर्ज करावेत.
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामधील नोकरीसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तुम्ही कोणत्याही फीशिवाय अर्ज करु शकणार आहेत.
पात्रता (Eligibility)
या भरतीसाठी अर्ज करताना तुन्हाला ४ वर्षांचा फुल टाइम डिग्री किंवा ३ वर्षांचा इंजिनियरिंग डिप्लोमा प्राप्त केलेला असावा. आयटीआय अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय/ NCVT सर्टिफिकेट प्राप्त केलेला असावा.
एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी १८ ते २६ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
निवडप्रक्रिया
एएआयमधील नोकरीसाठी उमेदवारांची निवड परीक्षा, इंटरव्ह्यू आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाणार आहे. यातील आयटीआय अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना ९००० रुपये पगार मिळणार आहे. ग्रॅज्युएट पदासाठी उमेदवारांना १५००० रुपये पगार मिळणार आहे. डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी १२००० रुपये पगार मिळणार आहे. या अप्रेंटिसशिपचा कालावधी १ वर्षाचा असणार आहे.