३००+ नोकऱ्यांसाठी मेगा प्लेसमेंट ड्राईव्ह, करिअरची सुवर्णसंधी; तत्काळ अर्ज करा!

पुणे जिल्ह्यात रोजगाराची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन केले आहे.

 

या मेळाव्यात पुणे शहरातील बी.ए.सी.एस एनर्जि प्रा.लि., एच.डि.एफ.सी लाईफ इन्शोरन्स, एफ.एफ सर्व्हिसेस प्रा.लि., सिध्दी सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि टि.के.आय.एल इंडस्ट्रिज प्रा.लि. या कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्यांमध्ये ट्रेनी, टेक्निशियन, स्टोअर हेल्पर, बिझनेस डेव्हलोपमेंट मॅनेजर, फायनॅन्शल कन्सल्टंट, वेल्डर, फिटर, एचआर, सिक्युरिटी गार्ड अशा विविध पदांसाठी ३०० पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध आहेत.

 

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आपले सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटा सोबत आणावा.

 

नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी एका जागेसाठी २५० विद्यार्थी रांगेत; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक परीक्षार्थी?

 

या नोकरी मेळाव्यात किमान १०वी, १२वी उत्तीर्ण, पदवीधर, आयटीआय आणि पदविकाधारक उमेदवार अर्ज करू शकतात. विविध कंपन्यांमध्ये ट्रेनी, टेक्निशियन, स्टोअर हेल्पर, स्टोअर असिस्टंट, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, फायनॅन्शल कन्सल्टंट, वेल्डर, पाईप फिटर, एचआर, हाऊसर्कीपिंग, सिक्युरिटी गार्ड, फिटर, गॅस वेल्डर अशा अनेक प्रकारच्या नोकऱ्यांची संधी आहे.

 

अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा ०२० २६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सु. रा. वराडे यांनी केले आहे.

 

TET चा फटका! २०-२५ वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांचे काय होणार? विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; तोडग्यासाठी समिती

 

पुणे जिल्ह्यात रोजगाराची मोठी संधी आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केला आहे. बी.ए.सी.एस एनर्जि, एच.डि.एफ.सी लाईफ इन्शोरन्स, एफ.एफ सर्व्हिसेस, सिध्दी सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि टि.के.आय.एल इंडस्ट्रिज या कंपन्या सहभागी होत आहेत. ट्रेनी, टेक्निशियन, वेल्डर, फिटर, एचआर, सिक्युरिटी गार्ड अशा विविध पदांसाठी ३०० पेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध आहेत.