कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी संस्थेत सहभागी व्हा! DRDO कडून फ्रेशर्स तरुणांसाठी भरती…

सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) कडून पेड (सशुल्क) इंटर्नशिपसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीमध्ये अंडरग्रॅज्युएट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट्स उमेदवार सहभागी होऊ शकतात. या इंटर्नशिपच्या माध्यमातून भारताच्या मुख्य संरक्षण-तंत्रज्ञान संघटनेत सहभागी होऊन उमेदवार जागतिक दर्जाच्या संशोधन क्षेत्रातील अनुभव मिळवू शकतात.

 

काय आहे पात्रता?

 

या भरतीअंतर्गत इंटर्नशिपसाठी डिफेन्स लॅबोरेटरी, जोधपूर (DLJ) मध्ये 20 पदे आणि सायन्टिफिट अॅनालिसिस ग्रुप (SAG)मध्ये 24 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांचं फुल-टाइम UG किंवा PG कोर्स म्हणजेच B.E./B.Tech (इंजीनियरिंग), M.E./M.Tech (टेक्नोलॉजी), M.Sc (सायन्स) मध्ये फायनल सेमिस्टर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच, या भरतीमध्ये नियुक्त होण्यासाठी मान्यताप्राप्त AICTE/UGC- संस्थेतून 75 टक्के गुण किंवा 7.5 CGPA किंवा त्याहून अधिक गुणांसह चांगला शैक्षणिक रेकॉर्ड असणं गरजेचं आहे.

 

डिफेन्स लॅबोरेटरी, जोधपूर (DLJ) साठी अर्ज करण्यासाठी 19 डिसेंबर 2025 आणि सायन्टिफिट अॅनालिसिस ग्रुप (SAG) साठी अर्ज करण्यासाठी 23 डिसेंबर 2025 शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

 

DRDO मध्ये इंटर्नशिपचे फायदे

 

1. या इंटर्नशिपच्या माध्यमातून रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट क्षेत्रात 6 महिन्यांच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगची संधी मिळेल.

2. DLJ मध्ये दरमहा 5,000 रुपये स्टायपेंड दिलं जाईल.

3. SAG मध्ये इंटर्नशिपच्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी 30,000 रुपये स्टायपेंड दोन हप्त्यांमध्ये दिलं जाईल: 3 महिन्यांनंतर 15,000 रुपये आणि 6 महिन्यांनंतर 15,000 रुपये.

4. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना DRDO कडून सर्टिफिकेट मिळेल, जे भविष्यात महत्त्वाचं ठरेल.

कसा कराल अर्ज?

 

अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अर्ज स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवणं आवश्यक आहे. जाहिरातीत दिलेल्या फॉर्मेटनुसार, उमेदवारांना अर्ज करावा लागेल. लिफाफ्यावर, उमेदवाराने ‘पेड इंटर्नशिपसाठी अर्ज’ असं स्पष्टपणे नमूद करावं आणि अर्जाची ओळख पटविण्यासाठी ‘शाखा (ब्रांच) कोड’ देखील नमूद करावा. हा अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावा: संचालक, संरक्षण प्रयोगशाळा जोधपूर, प्रा. दौलत सिंग कोठारी मार्ग, रतनदा, जोधपूर – 342011, राजस्थान.