10 वी पाससाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती; 64 हजार मिळेल पगार, वाचा. सविस्तर!

तूम्ही दहावी पास असाल आणि नोकरीची शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये दहावीच्या पात्रतेवर भरती निघाली आहे.

 

बँक ऑफ महाराष्ट्राकडून ‘कस्टमर सर्विस एसोसिएट’ अर्थात क्लर्क या पदासाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे आता तुम्हीही दहावीच्या पात्रतेवर नोकरी शोधत असाल ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया… या पदासाठीची अर्जप्रक्रिया, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक, पात्रता आणि वेतन किती असणार आहे.

 

अर्ज करण्याची अंतिम मुदत?

 

बँक ऑफ महाराष्ट्राकडून ‘कस्टमर सर्विस एसोसिएट’ची (क्लर्क) एकूण 12 पदे भरली जाणार आहे. ज्यासाठी 20 जूनपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली असून, 8 जुलै 2024 ही या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. वरील पदांसाठी बँक ऑफ महाराष्ट्राकडून दहावी उत्तीर्ण असल्याची पात्रता ठेवण्यात आली आहे.

 

काय आहे ‘या’ पदासाठीची वयोमर्यादा?

 

बँक ऑफ महाराष्ट्राकडून या पदासाठी 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी बँकेकडून केवळ ऑफलाईन अर्ज करण्याची करण्याचे आवाहन उमेदवारांना केले आहे. त्यामुळे उमेदवारांनी निहित नमुन्यात आपला अर्ज भरून बँकेकडे सादर करायचा आहे.

 

कुठे पाठवाल अर्ज?

 

या पदाच्या भरतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळ bankofmaharashtra.in ला भेट द्या. याशिवाय अर्जदार आपला अर्ज भरून, कागदापत्रांसह अंतिम दिनांकाच्या आत “महाव्यवस्थापक एचआरएम, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, ‘लोकमंगल’, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005.” या पत्त्यावर पाठवू शकतात.

 

किती आहे परीक्षा शुल्क?

 

बँक ऑफ महाराष्ट्राकडून या पदासाठीच्या अर्जासाठी590 रुपये शुल्क (खुला प्रवर्ग) निर्धारित करण्यात आले आहे. तर ओबीसी, एससी, एसटी यांच्यासाठी 118 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

 

किती मिळणार पगार?

 

उमेदवारांच्या आलेल्या अर्जांमधून योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी परीक्षा घेतली जाईल. असे बँक ऑफ महाराष्ट्राकडून सांगण्यात आले आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांना या पदासाठी 24050 रुपये ते 64480 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.