सरकारी कंपनीत नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) कडून वरिष्ठ विषय तज्ञ (सीनियर सब्जेक्ट एक्सपर्ट), विषय तज्ञ (सब्जेक्ट एक्सपर्ट), मेडिकल प्रोफेशनलसह विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार www.hindustancopper.com या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
या पदांवर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याच प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. फक्त, पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीच्या माध्यमातूनच उमेदवारांची निवड केली जाईल. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या या भरतीमध्ये, उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे.
काय आहे पात्रता?
भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवर्गानुसार, उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. सीनिअर सब्जेक्ट मायनिंग पदासाठी उमेदवारांकडे ग्रॅज्युएट लेव्हल बीटेक (B.Tech)/ मायनिंग इंजीनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे. एनव्हायरमेंट सीनिअर सब्जेक्ट एक्सपर्ट पदासाठी इंजीनिअरिंग/ टेक्नॉलॉजी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असणं गरजेचं आहे. तसेच, मायनिंग सब्जेक्ट एक्सपर्ट पदासाठी मायनिंग इंजीनिअरिंग क्षेत्रात बीटेक (B.Tech) डिग्री आणि त्यासोबतच, पदांनुसार संबंधित क्षेत्रात कार्याचा अनुभव देखील ग्राह्य धरला जाणार आहे.
किती मिळेल वेतन?
या पदांसाठी निश्चित मासिक वेतन नसून उमेदवारांना कंपनीला त्यांच्या व्हिजिट्स म्हणजेच भेटीनुसार पैसे दिले जातील. वरिष्ठ विषय तज्ञ, सहयोगी विषय तज्ञ आणि सहाय्यक विषय तज्ञांना दरमहा 16 व्हिजिट्स असतील. पदानुसार प्रत्येक व्हिजिटसाठी 3,500 रुपये ते 6,250 रुपये दिले जातील. याचा अर्थ मासिक पगार जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. यासोबतच, हॉटेल, रेल्वे आणि दैनंदिन वेतन यासारख्या सुविधा देखील उपलब्ध असतील. MBB पदवी असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांना प्रति व्हिजिट 3,500 रुपये मिळतील, तर MD/MS ची पदवी असलेल्यांना 4,750 रुपये मिळतील. याशिवाय, दररोज 800 रुपये वेगळा महागाई भत्ता दिला जाईल.