RRC Eastern Railway (ER) : Recruitment : रेल्वेमध्ये 3000 पदांची भरती सुरू झाली असून यासाठी फक्त दहावी पास इतक्याच शिक्षणाची अट तर ठेवण्यात आली आहे. या भरतीसाठी दिनांक 24 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाली असून ही भरती सुमारे 3115 पदांसाठी केली जाणार आहे. यासाठी अर्ज कसा करावा व इतर माहिती आता आपण जाणून घेऊ.
पदाचे नाव – अप्रेंटीशीप
पदसंख्या- 3115
पात्रता- यासाठी उमेदवार दहावी पास असावा आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण झालेला असावा.
वयोमर्यादा- उमेदवाराचे वय 24 वर्षांपर्यंत असावे याचबरोबर सवलतीच्या माहितीसाठी आपण खालील वेबसाईट पाहू शकता.
RRC Eastern Railway (ER) : Recruitment :
निवड प्रक्रिया- मुख्य म्हणजे या निवडीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही. दहावी आणि आयटीआय मध्ये पडलेल्या गुणांच्या आधारे ही निवड करण्यात येणार आहे. यासाठी परीक्षा फी रुपये शंभर इतकी ठेवण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा- या भरतीसाठी उमेदवारांनी rrcrecruit.co.in या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे अर्ज करावा.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 सप्टेंबर 2024 हा आहे. तर मित्रांनो तात्काळ अर्ज करून सदर भरतीचा लाभ घ्या.