Samajkalyan Pune :समाज कल्याण आयुक्तालय पुणे 219 लघुलेखक, लघुटंकलेखक, गृहपाल, समाज कल्याण निरीक्षक पदांच्या भरतीसाठी खालील पात्रतेच्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागित आहे.
गट क – पदे
पदांची नावे – लघुलेखक, लघुटंकलेखक, गृहपाल, समाज कल्याण निरीक्षक
पदसंख्या- 219
पात्रता- सर्व पदांच्या पात्रता वेगवेगळ्या असून त्या खालील दिलेल्या वेबसाईटवर पहावयास मिळतील.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी.
अंतिम दिनांक- 11 नोव्हेंबर 2024
अधिक माहितीसाठी https://sjsa.mahararashtra.gov.in ही वेबसाईट पहावी.
अधिक माहितीसाठी खालील माहिती देखील उपयुक्त राहील….
समाज कल्याण आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक संवर्गातील एकूण २१९ रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी, सदर पदांसाठी आवश्यक असलेली अहंता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
समाज कल्याण आयुक्तालयाच्या https://sjsa.mahararashtra.gov.in या संकेतस्थळावरील बातम्या (News) / महत्त्वाची संकेतस्थळे (USEFUL LINKS) मध्ये समाज कल्याण पदभरती २०२४ / social welfare | recruitment 2024 या मथळयाखाली सदरची सविस्तर जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर पदाकरिता दिनांक १०.१०.२०२४ ते दि.११.११.२०२४ या कालावधीकरिता ऑनलाइन अर्ज करता येईल. संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून सदर पदासाठीची विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट दैऊन, जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज, ऑनलाइन पध्दतीने, विहीत वेळेत सादर करावा.
उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ / मदतीकरीता भ्रमणध्वनी क्रमांक ९१९९८६६३८९०१. सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत सोमवार ते शनिवार उपलब्ध असेल.