सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (www.sangliurban.bank.in) येथे “करारतांत्रिक अधिकारी” (वर्ष अधिकारी / कनिष्ठ अधिकारी) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सांगली येथील मुख्य कार्यालयातील संगणक विभागासाठी ही भरती असून एकूण १५ जागा उपलब्ध आहेत (वर्ष अधिकारी – ५, कनिष्ठ अधिकारी – १०).
गोमंतकीय तरुणांसाठी सुवर्णसंधी! 67 पदांची होणार भरती; कुठे कराल अर्ज? जाणून घ्या..
अर्जदारांची वयोमर्यादा नियुक्तीच्या वेळी २५ वर्षांपेक्षा कमी असावी. वर्ष अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता – पदवीधर / पदव्युत्तर, तर कनिष्ठ अधिकारी पदासाठी डिप्लोमा / डिग्री इंजिनिअरिंग (कॉम्प्युटर सायन्स) / बीसीए / बीएससी (कॉम्प्युटर सायन्स) आवश्यक आहे.
अनुभवासाठी बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये अधिकारी पदावर १ ते १० वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. वेतन पात्रता व अनुभवानुसार ठरवण्यात येईल व योग्य उमेदवारांना करिअरमध्ये प्रगतीची चांगली संधी उपलब्ध आहे.
नोकरीचे ठिकाण सांगली (मुख्य कार्यालय) असेल. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने www.sangliurban.bank.in या वेबसाइटवरून सादर करावा. अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन आवश्यक कागदपत्रांसह बँकेकडे पाठवणे आवश्यक आहे.
PhonePe Personal Loan : मोबाईलवरून काही मिनिटांत वैयक्तिक कर्ज कसे मिळवावे?
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १६/०३/२०२६ असून, इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता लवकरात लवकर अर्ज करावा. सांगली अर्बन बँकेत नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे!