स्टेट बँक ऑफ इंडिया 13700 पदांसाठी भरती करून घेत असून याबाबत नुकताच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही पदे ज्युनिअर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) म्हणजेच मराठीमध्ये कनिष्ठ सहयोगी (ग्राहक संवर्धन आणि विक्री) या पदासाठी भरली जाणार आहेत.
यासाठी 17 डिसेंबर पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून सात जानेवारी 2025 अखेर अर्ज भरून घेतले जाणार आहेत. चला तर याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती…
यामध्ये प्रामुख्याने आता पाहू जागांबद्दलची वितरण – स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कनिष्ठ सहयोगी पदांसाठी एकूण 13735 रिक्त जागा जाहीर केल्या असून , यामध्ये सर्वाधिक 5870 पदे सर्वसाधारण श्रेणीसाठी राखीव आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता (EWS) 1361 पदे, इतर मागासवर्ग (OBC) साठी 3001 पदे, अनुसूचित जाती (SC) साठी 2118 पदे, आणि अनुसूचित जमाती (ST) साठी 1385 पदे उपलब्ध आहेत.
Udyogini Yojana: महिलांना मिळणार 3 लाखाचे बिनव्याजी कर्ज : उद्योगिनी योजना : जाणून घ्या माहिती
आता आपण पाहू पात्रतेबद्दलची सविस्तर माहिती… यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय 20 ते 28 वर्षांदरम्यान असावे. त्यामध्ये वयोमर्यादेची गणना 1 एप्रिल 2024 पासून करण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांनी आपली पात्रता आणि वयोमर्यादा तपासून अर्ज करणे आवश्यक आहे.
याबद्दलची परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. प्राथमिक परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये, तर मुख्य परीक्षा मार्च किंवा एप्रिल 2025 मध्ये आयोजित केली जाईल. मुख्य परीक्षेनंतर उमेदवारांना स्थानिक भाषेतील भाषा प्राविण्य चाचणी द्यावी लागेल, ज्यामध्ये स्थानिक भाषेतील कौशल्य सिद्ध करणे बंधनकारक असणार आहे .
परीक्षा फी – अर्ज शुल्काच्या बाबतीत, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी 750 रु तर SC, ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे . आणि अधिक माहितीसाठी देखील याच वेबसाईट वरती संपर्क साधून माहिती घेता येईल.