मित्रांनो, प्रत्येकाला कर्जाच्या आवश्यकताही असते. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी प्रत्येक व्यक्ती कर्ज हे घेतच असतात आणि या कर्जाचे परतफेड आपण विशिष्ट हप्त्याने करत असतो. हा हप्ता प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक आठवड्याला असतो. ज्या त्या कर्जाच्या स्वरूपावरून त्या हप्ता परतफेड आपण करत असतो. परंतु आजच्या लेखांमध्ये आपण क्रेडिट कार्ड च्या साह्याने कर्जाची परतफेड कशी करावी याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्हाला तर माहीतच असेल की क्रेडिट कार्ड हे बँके मार्फत दिले जाते. जर आपल्या अकाउंट मध्ये विशिष्ट रक्कम नसेल तर आपण क्रेडिट कार्डच्या साह्याने ती रक्कम घेऊ शकतो व ठराविक काळामध्ये ती बँकेला आपण परतफेड करावी लागते. यावर लागणारी विशिष्ट चार्जेस देखील बँक आपल्याकडून आकारत असते. याच क्रेडिट कार्डचा वापर करून आपण घेतलेला कर्जाची परतफेड देखील करू शकतो. ती कशी? याचीच माहिती आपण ज्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
जर तुम्हाला क्रेडिट कार्ड च्या साह्याने कर्जाची परतफेड करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करावे लागेल. ते ॲप म्हणजे mobikwik. ॲप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर च्या साह्याने आपण ह्या ॲप मध्ये लॉगिन करून घ्यावे. लॉगिन करण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर तिथे घालावा. मोबाईल नंबर घातल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो OTP तेथे घालावा. जेणेकरून मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल व आपण या ॲप मध्ये लॉगिन केले जाऊ.
या ॲपद्वारे जर आपल्याला कोणत्याही कर्जाचे रिपेमेंट करायचे असेल तेही क्रेडिट कार्डच्या साह्याने तर यावर कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जात नाहीत. जर तुम्हाला क्रेडिट कार्ड च्या साह्याने कर्जाचे रिपेमेंट करायचं असेल तर या ॲपमध्ये ईएमआय पेमेंट्स असा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपण ज्या बँकेमार्फत कर्ज घेतलेले आहोत त्या बँकेचे नाव तेथे टाईप करावे व ती बँक सिलेक्ट करावी.
बँक सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा लोन नंबर विचारला जाईल. तो नंबर तिथे घालावा. कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईएमआय chi अमाऊंट विचारले जाईल तिथे घालावी व ते बटनावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन येतील त्यातील आपल्याला क्रेडिट कार्ड पेमेंट वर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड ची संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी घालायचे आहेत.
ज्यामध्ये क्रेडिट कार्ड नंबर, एक्सपायर डेट, व्हॅलिडीटी, CVV या संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घालावी. त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटणावर क्लिक करायचे आहे. कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर चा नंबरशी तुमचा क्रेडिट कार्ड लिंक आहे त्या नंबर वर एक ओटीपी येईल तो तिथे घालावा व कंटिन्यू बटणावर क्लिक करावे.
क्लिक केल्यानंतर तुमच्या ईएमआय चे पेमेंट क्रेडिट कार्ड च्या साह्याने होईल व तुम्हाला एक मेसेज देखील येईल. ज्यावर रेफरन्स नंबर असेल त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या ईएमआय चे पेमेंट झालेले आहे की नाही हे पाहू शकता.
अशाप्रकारे तुम्हाला क्रेडिट कार्डच्या साह्याने एमआय पेमेंट करता येते.