मित्रांनो, राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील युवकांसाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक 27 नोव्हेंबर 1998 रोजी केली. राज्यामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे गरजेचे आहे, कारण या घटकातील बेरोजगार अशा युवकांना रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसरकारने 29 ऑगस्ट 1998 महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला व या निर्णयाची अंमलबजावणी करून राज्यामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबत माहिती, मार्गदर्शन व आर्थिक मदद करण्यात येते.
महाराष्ट्र सरकार राज्यातील जे युवक युवती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी कर्ज उपलब्धी करून देण्यासाठी एक पाऊल सरकार तर्फे पुढे टाकण्यात येत आहे या दृष्टीने सरकारची ही महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो आणि आपल्या एकूण लोकसंख्येच्या 54 टक्के लोकसंख्या ही वय वर्षे 30 च्या आत आहे म्हणून या मनुष्यबळाला कुशल मनुष्यबळ बनवणे गरजेचे आहे त्याने आपल्या देशाची उत्पादन क्षमता वाढेल व बळकट होण्यास मदत होईल, या वयोगटातील युवकांना रोजगार व स्वयं रोजगार निर्माण करण्यासाठी सक्षम करून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील युवा पिढीला या योजनेकडून हातभार लागणार आहे. उद्योजक बनवू इच्छिणाऱ्या आणि तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक मदत देऊन त्यांना रोजगार निर्मितीक्षम बनवणे असा या योजनेमागे शासनाचा उद्देश आहे.
Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेत बदल : आता मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज
हे पाऊल शासनाने राज्यातील बेरोजगारीची तीव्रता कमी करण्यासाठी या माध्यमातून बरेचशे असे कार्यक्रम शासनाने आणले आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व कर्ज सुलभ पद्धतीने वितरित होण्याकरिता स्वयंरोजगार वेब पोर्टल विकसित केले आहे. महाराष्ट्र राज्यामधील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील समुदायाच्या विकासासाठी शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादीत ची मुंबई येथे स्थापना केली आहे.या योजनेमुळे महाराष्ट्रामधील तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, पासपोर्ट साईजचेे दोन फोटो, स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र, जातीचा दाखला, व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र, बँक पासबुक, सीबील रीपोर्ट, व्यवसाय -प्रकल्प चे सदरीकरण, प्रशिक्षण प्रमाणपत्र, बँक कर्ज मंजुरी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या आवश्यकता आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेची पात्रता म्हणजे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदार व्यक्तींने यापूर्वी केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत व्यवसायासाठी कर्ज घेतलेले नसावे. अर्जदार व्यक्तीवर कुठल्याही बँकेचे कर्ज नसावे. अर्जदार व्यक्तीला स्वतःची संपूर्ण माहिती खरी द्यायची आहे तपासामध्ये कोणतीही माहिती खोटी आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेची उद्दिष्टे म्हणजे आपल्या राज्यातील तरुणांनाया व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे या योजनेमागचा उद्देश आहे.आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या तरुणांना सक्षम बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. आर्थिक दृष्ट्या गरिबा असणाऱ्या तरुणांना सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी या योजनेची सुरुवात झाली.अतिशय सोप्या पद्धतीने मोबाईल द्वारे आपण या योजनेचा घरबसल्या फायदा घेऊ शकतो.
त्याचबरोबर या योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत जो व्यवसाय करायचा आहे तो महाराष्ट्र राज्यात करणे गरजेचे आहे. या योजने अंतर्गत कृषी किंवा पारंपारिक उद्योग, लघु किंवा मध्यम उद्योग उत्पादनाचे अनेक उद्योग व्यवसाय किंवा विक्री क्षेत्रातील उद्योग किंवा सेवा क्षेत्र यात व्यवसाय करणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती सहकर्जदार म्हणून या योजनेत भाग घेऊ शकतात. अर्जदार व्यक्तींनी त्याची परतफेड केली नाही तर अशा परिस्थितीत व्याज परत केले जाणार नाही. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडला किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंत कर्ज दिले जाईल आणि या व्याजाची परतफेड अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळातर्फे केली जाईल. या योजने अंतर्गत बिनव्याजी कर्ज दिले जाते. योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींना शेती संदर्भात व्यवसाय सुरू करायचे त्या अर्जदाराची वय 45 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावी तरच या योजनेअंतर्गत त्यांना लाभ घेता येईल.
Home Loan : गृहकर्ज: गृहकर्जाचे प्रकार, खरेदी, दुरुस्तीसाठी, बँक, कागदपत्रे वाचा: सविस्तर माहिती
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ या योजनेचा अर्ज कसा करावा?. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास खालील अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे. आपल्या समोर जे पेज ओपन होईल त्यावर आपल्याला होम पेजवर क्लिक करायचे आहे. आता आपल्याला सर्व माहिती भरायची आहे व सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे. अशाप्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आपल्याला युजरनेम पासवर्ड मिळेल. आता आपल्याला दिलेले युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.आता आपल्याला आपल्या जिल्ह्याची निवड करायची आहे. आता समोर आपल्याला आपली सर्व वैयक्तिक माहिती दिसेल. आता आपल्याला आपण ज्या कंपनीचे मालक आहोत त्या कंपनीचा सर्व तपशील व्यवस्थित रित्या भरायचा आहे. वरती दिलेले सर्व कागदपत्रे या अर्जासोबत जोडायचे आहेत. अशाप्रकारे आपला अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Google Pay Sachet Loan: गुगल Pay 111 रुपयांच्या बदल्यात देईल 15000 रुपये कर्ज
अशा प्रकारे या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखनातून जाणून घेतलेल्या आहेत.