कोणत्याही हमीशिवाय घ्या 50 लाखांचे कर्ज : स्टेट बँकेची योजना

कोणत्याही हमीशिवाय 50 लाखांची कर्ज देणारी एक विशेष योजना स्टेट बँकेने नुकताच बाजारात आणण्याचे वृत्त प्रसारित होत आहे. ही योजना खास करून विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आली आहे.

Home Loan: इचलकरंजीत मिळतंय घरासाठी कर्ज : तुमच्या घरकुलासाठी अनेक योजना : वाचा आत्ताच

आज-काल शिक्षण इतकं महाग झाला आहे की कर्ज घेण्याची कोणताही पर्याय विद्यार्थ्यांकडे तसेच पालकांकडे राहत नाही. त्यामुळे कर्जही घ्यावीच लागते. अनेक पालकांना आपल्या मुलांचे शिक्षण परदेशात व्हावे असे वाटत असते. पण आर्थिक अडचणीमुळे ते शक्य होत नाही . जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल , तर हि आनंदाची बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. SBI ग्लोबल एड-व्हँटेज योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. तसेच, निवडक प्रकरणांमध्ये 3 कोटी रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज देण्याची सुविधाही आहे.

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

कोणत्याही हमीशिवाय, विद्यार्थी परदेशातील चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्यावर बँक 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकते . या कर्जामध्ये विद्यार्थ्याच्या पूर्ण शैक्षणिक खर्चाचा समावेश असतो, ज्यात ट्यूशन फी, पुस्तके, वसतिगृह खर्च, संगणक आणि इतर आवश्यक शिक्षण सामग्रीचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही, आणि ते त्यांच्या शैक्षणिक ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतात.

Bajaj Finance personal loan :  बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर 

विद्यार्थ्यांना 15 वर्षांपर्यंत कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळ भेटतो , ज्यामुळे कर्जाची मुदत दीर्घकालीन बनवली जाते आणि परतफेडीचा भार कमी होतो. याशिवाय शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कर सवलतही मिळते. आयकर कायद्यातील कलम 80 (E) अंतर्गत शैक्षणिक कर्जावर भरलेल्या व्याजावर कर सवलत मिळवता येते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक ओझे आणखी हलके होते.

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी विविध बॅंका आणि वित्तीय संस्थांनी वेगवेगळ्या व्याजदरांची घोषणा केली आहे. सामान्य शैक्षणिक कर्जासाठी व्याजदर 11.15% पर्यंत आहे. SBI च्या स्कॉलर लोन योजनेत (SBI Educational Loan), विशेषतः IIT आणि इतर प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, व्याजदर 8.05% ते 9.65% दरम्यान असतो, जो इतर कर्जांपेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे, ग्लोबल एड-व्हँटेज कर्जासाठी 10.15% व्याजदर द्यावा लागतो .

शैक्षणिक कर्जासाठी अर्ज (Loan Application) करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. विद्यार्थ्यांना बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच, त्यांना जवळच्या SBI शाखेत जाऊन प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याचीही संधी आहे. अर्ज प्रक्रियेच्या दरम्यान, काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते, जसे की ओळख आणि पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक दस्तऐवज, उत्पन्नाचा पुरावा, फोटो, पॅन कार्ड, व्हिजा संबंधित कागदपत्रे, SOP आणि इंग्रजी प्रवीणता चाचणीचे गुणपत्रक. या कागदपत्रांच्या आधारावर बँक कर्जासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणार आहे, आणि विद्यार्थ्यांना कर्ज मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल.

एसबीआयने कर्जाची सुविधा यूएसए, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जपान, जर्मनी, फ्रान्स, आयर्लंड आणि स्वित्झर्लंडसह अनेक देशांतील विद्यापीठांसाठी दिली आहे. परदेशातील उच्च शिक्षणासाठी SBI ग्लोबल एड-व्हँटेज योजना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी ठरू शकते.

टीप : वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. अशा प्रकारची योजना घेताना विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी संपूर्ण खात्री करूनच व्यवहार पूर्ण करावेत. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.