शैक्षणिक कर्ज : नर्सरी पासून पदवीपर्यंतच्या सर्व शिक्षणासाठी बँक ऑफ बडोदा देणार Student Loan: असा करा अर्ज

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की आजकालच्या महागाईच्या जीवनामध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी अनेक तडजोड करावी लागते. या शिक्षणासाठी लागणारा खर्च देखील खूप मोठा झालेला. तसेच या जन्मामध्ये शिक्षण घेतल्याशिवाय कोणताही पर्याय आपल्याला उरलेला नाही.

हे सर्व समान माणसांना परवडणारे नाही. म्हणूनच आज आपण शैक्षणिक कर्ज विषयीची माहिती पाहणार आहोत. की ज्याद्वारे नर्सरी पासून ते पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी आपल्याला हे कर्ज मिळते. या कर्जाबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

सध्याच्या युगात सर्वसामान्यांना शिक्षणाचा खर्च काही कमी नाही. लहान मुलांचे शिक्षण जरी करायचा असलं तरी तब्बल 30 ते 40 हजार रुपये खर्च हा पालकांना येतो. तर दहावीच्या पुढील शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च पालकांना उचलावा लागतो.

हा खर्च एकरकमी भरण पालकांना शक्य होत नाही आणि त्यामुळे आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळणं खूप अवघड जाते. शिक्षण घेण्यासाठी भारतातील विविध बँका शैक्षणिक कर्ज पुरवठा करतात. यामध्ये नर्सरी पासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

असाच एक पर्याय बँक ऑफ बडोदा ने बडोदा विद्या या नावाने सुरू केला आहे. या अंतर्गत तुम्ही नर्सरी पासून पाचवी पर्यंत, सहावीपासून आठवीपर्यंत आणि नववीपासून बारावीपर्यंत अशा कोणत्याही तीन टप्प्यांमध्ये शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.तुमच्या विद्यार्थ्यांचा ऍडमिशन नोंदणीकृत शाळांमध्ये असण गरजेचे आहे. State Board असो CBSE बोर्ड असो किंवा ICSE बोर्ड असो कोणत्याही बोर्ड मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेला असेल तर तुम्ही लोन ला अर्ज करू शकता.

हे शैक्षणिक कर्ज पालकांच्या नावावर दिले जातात. याचा Interest Rate 12.50% एवढा असतो 0.50 टक्के एवढा कन्सेशन विद्यार्थिनींना या कर्जमार्फत दिले जात. या कर्जासाठी तुम्हाला कोणतेही प्रोसेसिंग शुल्क द्यायचे नाही किंवा कागदपत्राचे शुल्क द्यायचे नाहीत किंवा कोणती Margin सुद्धा भरायच नाही.पालक जर आपल्या पाल्याचा ऍडमिशन नर्सरी पासून बारावीपर्यंत करत असेल तर त्यांच्यासाठी हा पर्याय खूप चांगला असणार आहे.

यामध्ये पालकांचे केवायसी डॉक्युमेंट्स लागतील. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कागदपत्रे, प्रवेश घेतल्याचा पुरावा, विद्यार्थ्यांचे मार्कशीट, शैक्षणिक खर्चाची माहिती असलेला Statement, पालकांचा उत्पन्नाचा पुरावा, बँक अकाउंट चे सहा महिन्याचे स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी डॉक्युमेंट इत्यादी कागदपत्रांच्या आवश्यकता लागेल. जास्तीत जास्त लोन चार लाखा रुपये पर्यंतचे मिळते.

तुमच्या रिपेमेंटच्या कॅपॅसिटीनुसार हे लोन दिलं जातं. या कर्ज मध्ये कॉलेजला देण्यात येणारे फी, लायब्ररीची फी, होस्टेलचा राहण्याचा खर्च, मुलांना घ्यावे लागणारे बुक्स किंवा इतर साहित्य कॉम्प्युटर/लॅपटॉप इतर विषयांचा खर्च या कर्जामध्ये कव्हर असेल.कर्जाची परतफेड बारा महिन्यानंतर तुम्हाला करायचे असते. पहिला हप्ता लोन मिळाल्यानंतर बारा महिन्यांनी सुरू होतो.

अशाप्रकारे तुम्हाला पण तुमच्या मुलासाठी जर शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरून जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.
https://www.bankofbaroda.in/personal-banking/loans/education-loan

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.