मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की कर्ज जर आपण काढले तर त्यावर लागणाऱ्या व्याज दरामुळे आपले बरेच पैसे हे आपण वाया घालवत असतो. काही लोक तर असे म्हणतात की लोन घेणे ही खूप वाईट गोष्ट आहे. यामुळे आपल्याला व्यवस्थित झोप लागत नाही. डोक्यामध्ये खूप सारे विचार येऊ लागतात. परंतु लोन घेणे ही गोष्ट चुकीची आहेच. पण लोन घेणे ही चुकीची गोष्ट आहे ती फक्त आपल्या चैनीच्या वस्तूसाठी.
जसे की आपण घर घेण्यासाठी कर्ज घेतो. कोणी म्हणतो की गाडी घेण्यासाठी कर्ज घेणार आहे. कोणी आपला चैनीच्या वस्तूंसाठी कर्ज घेतो. एखादी वस्तू असताना देखील ती वस्तू जुनी झालेली आहे म्हणून नवीन वस्तू घेण्यासाठी कर्ज घेत असतो. अशा गोष्टींसाठी आपण कर्ज अजिबात घेतले नाही पाहिजे. तर आजच्या या लेखांमध्ये आपण लोन कशासाठी घ्यावे की जेणेकरून आपण श्रीमंत होऊ शकतो. याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
आजकाल आपण पाहत आहोत की जे काही मोठी श्रीमंत व्यक्ती आहे ती व्यक्ती ही लोन घेतच असते. त्या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा त्याचे कर्ज घेण्यात ची जी रक्कम असते ती जास्त असते. परंतु त्या व्यक्ती त्या कर्जाच्या जोरावर इतक्या मोठ्या प्रमाणात त्यावर इन्कम करत आहेत की त्या खूप श्रीमंत होत आहेत. या व्यक्ती अशासाठी लोन घेत असतात की त्यांना माहीत असते की त्यांच्या केलेल्या उत्पन्नातून त्यांना जास्त प्रमाणात नफा मिळत आहे.
आणि तो नफा मिळवण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते. म्हणून ते गव्हर्मेंट च्या साह्याने लोन घेत असतात व आपला व्यवसायात मोठ्या प्रमाणात प्रगती करत असे आहेत. आजकाल ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या सर्व गव्हर्मेंट च्या कर्जाच्या पैशावर चालत आहेत. आपल्याला देखील लोन घेतले पाहिजे परंतु ते अशा कारणासाठी की जी काही आपली एखादी असेट आहे किंवा आपण जो काही व्यवसाय करणार आहोत त्या व्यवसायातून आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होणार आहे. अशा गोष्टींसाठी जर आपण कर्ज घेतले तर त्यातून आपल्याला खूप मोठा नफा मिळत असतो.
जर समजा तुम्हाला एक लाख रुपये ची आवश्यकता आहे आणि त्या एक लाख रुपये वरून भविष्यात खूप रुपये कमवू शकता. तर अशावेळी तुम्ही हे कर्ज रूपाने एक लाख रुपये घेऊन ते एक दोन वर्षांमध्ये परतफेड करू शकता व पुढची 40-50 वर्षे तुम्ही लाखो करोडो रुपयांचा प्रॉफिट मिळवू शकता. अशा ठिकाणी तुम्ही कर्ज घेतलेच पाहिजे. परंतु हे कर्ज घेण्यासाठी आपल्याला योग्य रिसर्च करणे खूप गरजेचे आहे.
आपण जो काही व्यवसाय करत आहोत तो व्यवसाय कोणत्या ठिकाणी करावा? कोणता करावा? आपल्याकडे कोणकोणते स्किल्स आहेत की ज्यातून आपण तो व्यवसाय सुरू करू शकतो? कोणत्या ठिकाणी केला वर आपल्याला किती नफा मिळू शकतो? याबद्दलची संपूर्ण माहिती काढा आणि योग्य तो रिसर्च केला नंतरच मग तुम्ही लोन घ्या. त्याचबरोबर जर तुम्हाला एखादा गोष्टीचे संपूर्ण नॉलेज असेल. सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील. सर्व काही तुम्हाला येत असेल.
परंतु फक्त तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल. या पैशामुळे तुम्ही तो व्यवसाय सुरू करत नसाल तर अशावेळी देखील तुम्ही कर्ज घेऊन तो व्यवसाय सुरू करू शकता व ती कर्जाची परतफेड तुम्ही एक-दोन वर्षात फेडू शकता व पुढचे संपूर्ण आयुष्य तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.
अशा वेळी जर तुम्ही कर्ज घेतले तर ते तुमच्या फायद्याचेच ठरेल. या घेतलेला करता तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल. आजकाल ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कर्जाच्या जोरावरच पर्यंत पोहोचलेला आहे. परंतु ती कंपनी काढण्यासाठी त्या व्यक्तीकडे योग्य ते नॉलेज होते म्हणून ती व्यक्ती आज त्या ठिकाणी गेलेली आहे.
अशा प्रकारे तुम्ही कर्ज घेऊन देखील श्रीमंत बनू शकतात. परंतु त्यासाठी आपल्याकडे योग्य नॉलेज असणे खूप गरजेचे आहे.