ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारत सरकार विविध क्षेत्रातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना सातत्याने राबवत असते. त्यामध्ये 2015 मध्ये सरकारने लघु उद्योगांना गती देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना ही सुरू केली. या योजनेद्वारे स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या किंवा त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या साठी अत्यंत कमी व्याज दारात कर्ज देते.
तर या योजनेसाठी कोणती व्यक्ती पात्र ठरू शकते आणि कोणती व्यक्ती अपात्र ठरू शकते याबाबतची विशेष माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
Personal Loan: पर्सनल लोन ‘अशा’ लोकांना लगेच मिळते : जाणून घ्या माहिती
Personal Loan: ॲक्सिस बँक देत आहे 50 हजार ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन : हप्त्याची सोय चांगली
पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सरकार तीन प्रकारची कर्ज देते यामध्ये शिशु, किशोर आणि तरुण अशी विविध प्रकारची कर्जे केली जातात. शिशु योजनेत 50 हजार रुपयांपर्यंत जास्तीत जास्त कर्ज दिले जाते. किशोर रेड्डी रुपये 50 हजार ते पाच लाखापर्यंत चे कर्ज दिले जाते आणि तरुण योजनेतून दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
इतकेच नाही तर आता तरुण प्लस श्रेणीत वीस लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाऊ लागले आहे. असं जरी असले तरी हे कर्ज ज्याची त्याची पात्रता पाहूनच देण्यात येते. ही सर्व कर्जे बँका मायक्रो फायनान्स संस्था किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या द्वारे दिली जातात. त्यावरील खूपच कमी असते.
Personal Loan: ॲक्सिस बँक देत आहे 50 हजार ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन : हप्त्याची सोय चांगली
ज्यामुळे छोट्या व्यावसायिकांना दुकानदारांना किंवा नव्याने व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना परतफेड करणे साहजिकच सोपे होते. विशेष म्हणजे याला कोणत्याही प्रकारच्या कारण ठेवण्याची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे नवीन उद्योजकांना सुरुवातीलाच मोठा दिलासा मिळतो.
हे कर्ज घेण्यासाठी कर्जदार हा भारताचा रहिवासी असावा. जय व्यवसाय साठी तो कर्ज घेत आहे त्याबाबतची सविस्तर व ठोस कागदपत्रे असावीत. त्याचा आधार कार्ड ,पॅन कार्ड ,बँक स्टेटमेंट या गोष्टी असाव्यात.
आतापर्यंत लाखो लोकांनी स्वतःचा व्यवसाय या योजनेद्वारे सुरू केला आहे. आपणही या योजनेची सविस्तर माहिती घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकता किंवा असणारा व्यवसाय वाढवू शकता. अधिक माहितीसाठी मुद्रा कर्ज योजना याबाबतची माहिती आपण जवळच्या ज्या बँकेत योजना उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता.