RTE 25% प्रवेश 2024-25 प्रारंभ RTE दस्तऐवज  rte admission 2024 maharashtra 

मित्रांनो, आरटीई मध्ये 25% प्रवेश हा मोफत मध्ये दिले जाणार आहे. असा दस्तऐवज महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये आपण अर्ज कशा पद्धतीने करू शकतो? अर्जासाठी पात्र कोण कोण आहे? अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागतील? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

 

राखीव जागांवर मोफत प्रवेश देण्यासाठी यंदा ऑनलाइन अर्ज प्रक्रिया विलंबाने सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १६ ते ३० एप्रिलपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. आरटीई पोर्टलवर शाळांची नोंदणी पार पडल्यानंतर आरटीई कायद्यांतर्गत दुर्बल, वंचित, समाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता २५ टक्के रिक्त जागांवर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास सुरुवात होते.

 

मात्र, यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेला तब्बल दोन महिने उशिराने सुरुवात झाली आहे. त्यात दीड महिना केवळ शाळांची नोंदणी करण्यामध्ये गेला आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत Rte अर्ज करण्यास केव्हा सुरुवात होणार? याची पालक मागील अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहात होते. यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. घरापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय, अनुदानित शाळांमध्ये बालकांना प्रवेश दिला जाणार आहे.

 

पालकांनी आपल्याचे विहित मुदतीत भरावेत, एका बालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास ते सर्व अर्ज रद्द होतील. त्यामुळे एकच अर्ज भरावा. तो अचूक असावा. जन्म तारीख अथवा मोबाइल नंबर भरताना चुकल्यास तो अर्ज डिलेट करुन पुन्हा नवीन अर्ज भरावा. RTE एडमिशन 2024-25 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?, तसेच RTE अंतर्गत निवड झाल्यावर एडमिशन घेत असतांना कोणती कागदपत्रे लागतील?

 

याविषयी बऱ्याच पालकांना माहिती नाही. त्यामुळे त्यांचा जास्त वेळ कागदपत्रे माहित करण्यात व ते जमवन्यामध्ये जातो आणि बऱ्याच वेळा त्यांना योग्य कादाग्पत्रे माहित नसल्यामुळे त्यांना फॉर्म भरायचा राहूनच जातो. तर आता 16 एप्रिल पासून RTE साठी एडमिशन फॉर्म सुरु झालेले आहेत. तर ऑनलाईन फॉर्म भरत असतांना लागणारे कागदपत्रे कोणते, आणि सिलेक्शन झाल्यावर एडमिशन घेते वेळी लागणारे कागदपत्रे कोणते? हे आपण जाणून घेऊया.

 

RTE 25% साठी ऑनलाईन फॉर्म भरतो त्यावेळी लागणारे कागदपत्रे आधार कार्ड, जन्म दाखला, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, पत्याचा पुरावा, विद्यार्थी अपंग असल्यास अपंग दाखला कागदपत्रांची आवश्यकता आहे. RTE मध्ये सिलेक्शन झाल्यावर शाळे मध्ये एडमिशन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, मतदान कार्ड वीज बिल (कोणतेही एक), जातीचा दाखला, अपंग दाखला (विद्यार्थी अपंग असल्यास), उत्पन्न दाखला, जन्म दाखला, वडील हयात नसल्यास त्यांना मृत्यू दाखला, अनाथ असल्यास त्याचा पुरावा, ई. कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 

अशाप्रकारे तुम्ही जर तुमच्या पाल्याचे आरटीई मध्ये ऍडमिशन करणार असाल तर नक्कीच याचा ऑनलाइन फॉर्म भरा. त्याबद्दलची लागणारी कागदपत्राची माहिती वरील लेखांमध्ये दिलेली आहे.