2025 मधील शेवटचा महिना असलेल्या डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस बंद राहणार आहेत. विविध राज्यातील सण आणि उत्सवांच्या निमित्तानं बँका त्या ठिकाणी बंद असतील. तर, साप्ताहिक सुट्टीमुळं बँका 6 दिवस बंद राहणार आहेत. डिसेंबरमध्ये ख्रिसमस शिवाय इतर राज्यातील स्थानिक सणांमुळं बँका बंद राहतील.
LPG price: भारत-अमेरिका करारामुळे गॅस सिलिंडरचे दर स्वस्त होणार की नाही? जाणून घ्या A टू Z माहिती
डिसेंबर महिन्यात बँकेतील काही कामांचं नियोजन करत असाल तर तुम्हाला बँकांना सुट्टी कधी आहे. हे माहिती असणं आवश्यक आहे. डिसेंबरमध्ये बँकेत चेक जमा करणे, डीडी तयार करणे किंवा कर्जासंदर्भातील काही कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर तुम्हाला बँकांना किती दिवस सुट्टी आहे हे माहिती असणं आवश्यक आहे.
केंद्रीय व नवोदय विद्यालय १४९६७ शिक्षक/ शिक्षकेतर पदांची भरती
सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी सर्वात आकर्षक योजना
डिसेंबरमध्ये बँका कोणत्या दिवशी बंद राहणार ?
1 डिसेंबर : इंडिजिनस फेथ डे (अरुणाचल प्रदेश )
3 डिसेंबर : सेंट फ्रान्सिस झेविअर उत्सव (गोवा)
12 डिसेंबर : पा तोगन नेंगमिंजा संगमा दिवस (मेघालय)
18 डिसेंबर : गुरु घासीदास जयंती (छत्तीसगड), यू सोसो थम पुण्यतिधी (मेघालय)
19 डिसेंबर : गोवा मुक्ती दिवस (गोवा)
Google Pay, Phone Pay, Paytm: गुगल पे, फोन पे, पेटीएम वापरणे आता मागणार?
D Mart Offers : डी मार्ट मध्ये कोणत्या दिवशी मिळत सर्वात स्वस्त सामान? वाचा आत्ताच
24 डिसेंबर : ख्रिसमस ईव (मेघालय, मिझोरम)
25 डिसेंबर : ख्रिसमस (बहुतांश राज्यात बँकांना सुट्टी)
26 डिसेंबर : ख्रिसमस सेलीब्रेशन (मेघालय, मिझोरम, तेलंगाणा) शहीद उधमसिंह जयंती (हरियाणा)
27 डिसेंबर : गुरु गोविंद सिंह जयंती (हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश )
30 डिसेंबर : यू कियांग नांगबाह दिवस (मेघालय) तामू लोसर (सिक्कीम)
31 डिसेंबर : नववर्ष स्वागत (मिझोरम, मणिपूर )
Railway Recruitment : रेल्वे भरती : 4116 अप्रेंटिस पदांची भरती: दहावी पासला संधी
दरम्यान, 7 डिसेंबर, 14 डिसेंबर, 21 डिसेंबर, 28 डिसेंबरला रविवार असून साप्ताहिक सुट्टी असेल. तर, 13 डिसेंबर आणि 27 डिसेंबरला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार निमित्त बँकांना सुट्टी असेल.
बँकांना सुट्टी असल्यास बँकिंगचे व्यवहार कसे करायचे?
बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल किंवा सणांनिमित्त सुट्टी असेल त्यादिवशी ऑनलाईन बँकिंग, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे आर्थिक व्यवहार करु शकता. एटीएममधून रोख रक्कम काढू शकता. आता बहुतांश व्यवहार यूपीआय द्वारे होत असल्यानं बँका बंद असल्याची फार अडचण येत नाही. याशिवाय बँकांनी त्यांची ॲप तयार केली आहेत. त्यावरुन देखील पैशांची देवाण घेवणा करता येते.