ताजी बातमी/ऑनलाइन टीम
Budget 2024 : नुकताच नव्या सरकारचे म्हणजेच मोदी सरकार 3.0 चे पहिले आर्थिक बजेट सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने शेती, युवावर्ग , महिला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना बाबत मोठ्या घोषणा करण्यात आली आहे.
आता यामध्ये आपण पाहू की महिला आणि मुलींसाठी तीन लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये इंडिया पोस्ट बँकेच्या माध्यमातून शंभरहून अधिक शाखा स्थापन करण्यात येणार आहेत.
या योजनेद्वारे महिला आणि मुलींसाठी विविध उपक्रम राबवण्यात देखील येणार आहेत.