तुमचा पगार किती? आणि तुम्ही काम करता किती? सीपीआर च्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी : पालकमंत्र्यांनी झापलं

राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा कणा मानल्या जाणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे अनेक प्रस्ताव महिन्यांपासून प्रलंबित आहेत. तसेच शिक्षकांना देण्यात आलेल्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणामुळे “गरिबांचा दवाखाना” म्हणून ओळख असलेल्या सीपीआर रुग्णालयाचा (CPR Hospital) कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याची गंभीर दखल घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी काल (दि. 28) दुपारी अचानक कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला भेट देत अधिकाऱ्यांची जोरदार खरडपट्टी काढली.

लाडकी बहीण- या तारखेला 1500 रुपये जमा होणार : तारीख आली समोर

वेळेवर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना झापताना आबिटकर म्हणाले, “तुमच्यामुळे सीपीआरची बदनामी होत आहे. कार्यपद्धतीत तातडीने सुधारणा करा, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही. शासनाचे सर्वाधिक नुकसान तुम्हीच करत आहात. अशी सेवा देणार असाल तर लोकांनी काय मरायचं का? निवांत बसणे हा तुमचा जॉब नाही. लोकांना मदत करण्यासाठी आपण आहोत, त्रास देण्यासाठी नाही. सरकारच्या योजनेचा लाभ नागरिकांना घेऊ देत नाही, तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती? अशा शब्दांत त्यांनी प्रशासनावर कडक शब्दांत प्रहार केला.

निवडणुका होणारच, स्थगिती नाही…; महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयात आज काय काय घडलं?

दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोग्यमंत्र्यांचा ताफा अचानक सीपीआर रुग्णालयात दाखल होताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) हे कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी आधारवड मानले जाते. मात्र अलीकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे, औषध खरेदीतील अनियमितता, एजंटांचा हस्तक्षेप अशा गंभीर प्रकारांमुळे सीपीआर व्यवस्थापनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कालच उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले होते.

मुलांसाठी LIC च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; बक्कळ फायदा मिळवा

या सर्व पार्श्वभूमीवर आबिटकर यांनी विविध विभागांना भेट देत दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला. “रुग्णांकडे दुर्लक्ष का होते?” असा प्रश्न विभागप्रमुखांना विचारत त्यांनी संबंधित दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांना दिल्या.

गुड न्यूज : पेट्रोल स्वस्त…फक्त 70 रुपयात?

सीपीआरमध्ये दररोज लाखो रुग्ण उपचारासाठी येतात; मात्र प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आरोग्यमंत्र्यांच्या या कठोर निरीक्षण दौऱ्यानंतर आता तरी सीपीआरचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या वेळी कान-नाक-घसा विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे, डॉ. अनिता परितेककर, डॉ. अनिता सायबनवार, डॉ. गिरीश कांबळे, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप, समाजसेवा अधिकारी शशिकांत रावळ, आरोग्यदूत बंटी सावंत, वैद्यकीय शिबीर समन्वयक कृष्णा लोंढे यांसह रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मुलांसाठी LIC च्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; बक्कळ फायदा मिळवा