स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम; पुढील सुनावणी आता शुक्रवारी : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत आज काय काय घडलं?

Supreme Court Maharashtra Local Body Election 2025: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यादृष्टीने (Maharashtra Local Body Election 2025) अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ओबीसी आरक्षणासंबंधीच्या (OBC Reservation) याचिकेवर आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सॉलिसिटर जनरल याप्रकरणात वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायलायने याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (28 नोव्हेंबर) ठेवली आहे. त्यामुळे सुनावणी लांबल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे.

Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मिळणार 3 हजार रुपये?

लाडक्या बहि‍णींसाठी सर्वात मोठी घोषणा : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयात आज काय काय घडलं? (Supreme Court Maharashtra Local Body Election 2025)
याचिकाकर्ता- बांठिया आयोगाच्या आधीच्या परिस्थित मध्ये ओबीसीला आरक्षण नव्हतं..तेव्हाचा कायदा म्हणजे खानविलकर यांच्या खंडपीठाने दिलेले निकालपत्र ..ज्यात आरक्षणच नव्हतं.
तुषार मेहता ( सॉलिसिटर जनरल ) – कोर्टाला ठरवू दे
तुषार मेहता – आम्ही सद् हेतूने कोर्टाच्या आदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला ..आम्ही अजून माहिती घेतो आहे ..पण एक दिवस नंतर सुनावणीला ठेवता येईल का ?..नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुका आहेत. 2 डिसेंबर ..246 परिषद , 42 नगर पंचायत निवडणुका आहेत ..जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका बाकी आहेत

Bank Holiday List : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयच्या यादीनुसार बँकांना किती दिवस सुट्टी असणार? जाणून घ्या

Salary : पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?

रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!

इंदिरा जयसिंग (याचिकाकर्ता)- आधीच निवडणुका जाहीर आहेत. अर्ज भरून झाले आहेत.

याचिकाकर्ता- 40 टक्के नगरपरिषदेत पन्नास टक्के आरक्षण उल्लंघन झाले आहेत.

सरन्यायाधीश सूर्यकांत- आज आम्ही कोणतेही मत मांडत नाही.

तुषार मेहता- गुरूवारी किंवा शुक्रवारी ठेवूया.

निवडणूक आयोगाकडून वेळ वाढवून मागितला. त्यावर याचिकाकर्त्यांने जोरदार आक्षेप घेतला.

याचिकाकर्ता- 50 टक्के आरक्षण उल्लंघन झाले आहे.

सरन्यायाधीश- शेवटी या प्रकरणातील आदेशाला बांधील असूनच निवडणूक होणार आहेत.

आयोग- आज तुम्ही निर्णय केलात तर त्यानुसार आम्हाला आरक्षण वर्गवारी करावी लागेल.

शुक्रवारी याच वेळेला 12 वाजता

सरन्यायाधीश सूर्यकांत – शुक्रवारी पुढील सुनावणी

काय आहे नेमका वाद? (Maharashtra Local Body Election 2025)
विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा आहे की काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा अनुपात घटनात्मक 50 टक्के मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे, जे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र असा की, बांठिया आयोगाच्या अहवालाचा संदर्भ घेत आरक्षणाची रचना योग्य पद्धतीने करण्यात आली आहे, असा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे.

सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी सर्वात आकर्षक योजना

रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!

50% आरक्षण मर्यादा किती ठिकाणी ओलांडली जात आहे? (Nagarpanchayat-Nagarparishad Election 2025)
जिल्हा परिषद – 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये
पंचायत समिती- 336 पैकी 83 पंचायत समित्यांमध्ये
नगरपालिका- 242 पैकी 40 नगरपालिका क्षेत्रात
नगर पंचायत- 46 पैकी 17 नगरपंचायतींमध्ये
महापालिका- 29 पैकी 2 महापालिका क्षेत्रात