इचलकरंजी शहरातील ग्राहकांचा विश्वास जिंकत न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्सने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात पन्नास सुवर्ण वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. 1975 साली छोट्याशा सुरुवातीने सुरू झालेल्या या प्रतिष्ठानाने आज घरगुती उपकरणांपासून ते अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांपर्यंत दर्जेदार सेवा देत ग्राहकांशी आपुलकीचे नाते जपले आहे. या यशस्वी प्रवासाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी भव्य ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा श्री. सुजित मगदूम म्हणाले, या ऑफरमध्ये शोरूममधून कोणतीही वस्तू खरेदी केल्यास ५० टक्के रोख रक्कम परत मिळवण्याची अनोखी संधी उपलब्ध आहे. तसेच क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटची आकर्षक योजना आहे. ग्राहकांसाठी 0% फायनान्स सुविधा देण्यासाठी बजाज फायनान्ससोबत खास करार करण्यात आला असून EMI कार्ड मोफत मिळणार आहे. फ्रिज किंवा वॉशिंग मशीन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ गिफ्ट मोफत देण्यात येणार आहेत.
याशिवाय फक्त ₹७,९९० पासून एलईडी टीव्ही उपलब्ध असून ब्रँडेड एसी कमी झालेल्या दरात खरेदी करता येतील. LPG गॅस शेगडीवर भव्य एक्सचेंज ऑफर असून जुन्या शेगडीच्या बदल्यात नवीन घेण्याची सोय आहे. खरेदीसोबत आकर्षक फ्री गिफ्ट्सही देण्यात येत आहेत. यामुळे आपल्या घरासाठी आवश्यक असलेली प्रत्येक वस्तू किफायतशीर दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळत आहे.
याचबरोबर आमच्याकडे उत्तम क्वालिटीचे रिमोट फक्त ₹49/- मध्ये उपलब्ध आहेत. टीव्ही, सेट टॉप बॉक्स तसेच विविध उपकरणांसाठी दर्जेदार रिमोट्स मिळतील. याशिवाय सर्व कंपनींचे एसीचे रिमोट्सही होलसेल दरात देण्यात येत आहेत. त्यामुळे जुन्या किंवा खराब झालेल्या रिमोटच्या बदल्यात कमी किमतीत नवीन रिमोट खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.
न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्समध्ये LG, Samsung, Bosch, Philips, Haier, Clarion, Orient, Bajaj यांसारख्या नामांकित ब्रँड्सची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे. कोल्हापूर रोड, LG ब्रँड शॉपी व मल्टिब्रँड शॉपी, कोल्हापूर नाका, इचलकरंजी येथे असलेल्या या शोरूमला भेट देऊन ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
पन्नास वर्षांच्या विश्वासाच्या परंपरेसोबत आकर्षक ऑफर्स, परतावा योजना आणि विशेष रिमोट ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी आजच न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या आणि आपल्या घरासाठी दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने अतिशय किफायतशीर दरात खरेदी करण्याची ही संधी सोडू नका, असेही शेवटी सुजित मगदूम यांनी सांगितले.