वेळेवर EMI भरूनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा काय आहे कारण

क्रेडिट स्कोर ला सिबिल स्कोर असे देखील म्हटले जाते नवीन कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोर खूप महत्त्वाचा असतो क्रेडिट स्कोर चांगला असेल तर लवकर आणि कमी व्याजदरामध्ये आपल्याला लोण देखील घेता येते क्रेडिट स्कोर चांगला ठेवणे हे आव्हानात्मक काम असते थोडीशी चूक देखील तुमचा क्रेडिट स्कोर शंभर पॉईंट ने खाली देखील आणू शकतो वेळेवर यमाय न भरणे हे क्रेडिट स्कोर खाली येण्याचं मुख्य कारण आहे पण काही वेळा वेळेवर यम आय भरूनही क्रेडिट स्कोर कमी होते. या पाठीमागे कोणती कारणे असू शकतात ते देखील आज आपण जाणून घेणार आहोत मनी कंट्रोल ने याबाबतची माहिती दिलेली आहे.

क्रेडिट स्कोअर कमी का होतो?
वेळेवर पेमेंट करूनही एका व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर 50 गुणांनी घसरला. विशेष म्हणजे त्याचा खर्च त्याच्या क्रेडिट मर्यादेच्या 30 टक्क्यांपेक्षा कमी होता. या व्यक्तीचं क्रेडिट स्टेटमेंट पाहिल्यानंतर असं निदर्शनास आलं की, त्या व्यक्तीने दर महिन्याला फक्त मिनिमम ड्यु रक्कम भरली होती. यामुळे तिची ड्यू रक्कम क्रेडिट मर्यादेच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त झाली. हे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे तिचा क्रेडिट स्कोअर घसरत होता. पूर्ण पेमेंट केल्यानंतर या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर तीन महिन्यांत सुधारला.

नवीन लोन देखील ठरू शकतं कारण
आणखी एका प्रकरणात, एका महिलेचा क्रेडिट स्कोअर 848 वरून 40 पॉईंट्सनी खाली घसरला. ती प्रत्येक पेमेंट वेळेवर करत असूनही क्रेडिट स्कोअर खाली आला. व्यवस्थित पडताळणी केल्यानंतर निदर्शनास आलं की,
अगोदर एक लोन अस्तित्वात असतानाही तिने दुसरं होमलोन घेतलं होतं. या लोनची सुरुवात होताच तिचा क्रेडिट स्कोअर खाली गेला. वन टाईम पेमेंट करून ही
समस्या सोडवली जाऊ शकते. लोनची परतफेड झाल्यामुळे
क्रेडिट स्कोअर सुधारेल.

भारतात चार क्रेडिट स्कोअर कंपन्या आहेत ज्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेने परवाना दिलेला आहे. क्रेडिट
इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL), एक्सपीरियन, इक्विफॅक्स आणि हायमार्क अशी या कंपन्यांची नावे आहेत. यातील सिबिल ही सर्वांत लोकप्रिय रेटिंग कंपनी आहे. सिबिल क्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांकाच्या रुपात दर्शवला जातो. 300 ते 900 च्या
दरम्यान हा क्रमांक असतो. 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो आणि 900 हा सर्वोत्तम स्कोअर मानला जातो.