10 वी, 12 वी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार .. तुमचं नाव चेक करा…

मित्रांनो आपण दहावी-बारावीची परीक्षा तर दिलाच असाल. या परीक्षेमध्ये बोर्ड आपला कडून परीक्षा फी आकारात असते. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. तुम्ही दहावी आणि बारावीची परीक्षा आता दिली असेल तर तुम्ही जी काही परीक्षा फी भरलेली आहे. ती परीक्षा फी तुम्हाला परत मिळणार आहे आणि त्या संदर्भात लिस्ट सुद्धा लागलेली आहे. तुम्ही तुमचं नाव सुद्धा चेक करू शकता. या लेखांमध्ये तुम्ही तुमचं नाव कसं चेक करायचं? आणि ही परीक्षा फी कशी तुम्हाला मिळणार आहे? हे जाणून घेणार आहोत. 

 

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन यांच्यातर्फे 2 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक काढण्यात आलेले आहे. यामध्ये असे सांगितलेले आहे की दहावी बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेली परीक्षा तीही त्यांना परत मिळणार आहे. मी परत मिळणारे फी टंचाईग्रस्त किंवा दुष्काळ भागातील जे काही दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांची जी काही परीक्षा फी आहेत ती परत मिळणार आहे.

 

आणि ही परीक्षा फी राज्यमंडळ स्तरावरून परत करण्यात येणार आहे. शासन निर्णय म्हणजे जीआर नुसार जाहीर झालेल्या जे काही दुष्काळ दृश्य 40 तालुके आहेत यामध्ये आणि या व्यतिरिक्त १०२१ महसूल मंडळ आहेत यांना ही फी परत मिळणार आहे. म्हणजे या दुष्काळदृश्य 40 तालुक्यांमध्ये तुम्ही येत असाल तर ही तुम्हाला फी मिळणार आहे. ज्यामध्ये माध्यमिक शाळा असतील, उज्जय माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय असतील यांचा समावेश केलेला आहे.

 

मार्च 2014 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी दहावी बारावीच्या परीक्षा दिलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा फी परत दिली जाणार आहे या संदर्भात लिंक सुद्धा काढण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा 3 एप्रिल ते 12 एप्रिल 2024 पर्यंत तुमचं जे काही बँक अकाउंट आहे म्हणजे जर विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट नसेल तर त्यांच्या पालकांचे बँक अकाउंट नंबर तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन जमा करायचा आहे.

 

त्यानंतर तुम्हाला ही परीक्षा फी मिळणार आहे.मित्रांनो तुम्ही या 40 तालुके इथे दिलेली आहे त्या तालुक्यांमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला तुमचे बँक खाते किंवा तुमच्या पालकांचे बँकांचे शाळेमध्ये जाऊन जमा करायचे आहेत. जालना,बदनापूर,अंबड,मंठा, छत्रपती संभाजीनगर ,सोयगाव,मालेगाव,सिन्नर, येवला, पुरंदर सासवड, बारामती, वडवणी, धारूर ,आंबेजोगाई, रेनापुर, वाशी, धाराशिव, लोहार, बार्शी, माळशिरस, सांगोला, सिंदखेडा, बुलढाणा, लोणार, शिरूर, घोडनदी,

दौंड, इंदापूर, करमाळा, माढा, वाई, खंडाळा, हातकणंगले, गडहिंग्लज, शिराळा, कडेगाव, खानापूर, विटा, मिरज असे हे एकूण 40 तालुके आहेत.

 

तर यामध्ये तुम्ही येत असाल तर लवकर आपलं जे काही बँक अकाउंटचं पासबुक असेल त्याची झेरॉक्स जाऊन जमा करायचे आहे. याशिवाय महसूल विभागातील एकूण 1021 शहरे आहेत की ज्यांची फी माफ झालेली आहे. तर अशा व्यक्तीने देखील आपले बँक पासबुक लवकरात लवकर आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये जाऊन जमा करावे.

 

अशाप्रकारे तुम्ही देखील या 40 जिल्ह्यांमध्ये तसेच महसूल विभागामध्ये येत असाल तर तुम्ही देखील तुमच्या बँक पासबुक तुमच्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये जमा करावी.